शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
2
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
3
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
4
"मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
5
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
6
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
7
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
8
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
9
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
10
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
12
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
13
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
15
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
16
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
17
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
18
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
20
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?

coronavirus: बेड मिळविण्यासाठी नातेवाइकांची धडपड, अधिकारी, लोकप्रतिनिधींना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2021 3:21 AM

coronavirus: कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत.

नवी मुंबई : कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीही अपूर्ण असल्यामुळे नागरिकांच्या गोंधळामध्ये भर पडत आहे. नवी मुंबईमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या सहा हजारपेक्षा जास्त असून, उपचारासाठी उपलब्ध बेडची संख्या ३८९७ एवढी आहे. मनपा प्रशासनाने डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीप्रमाणे रुग्णालयांमध्ये २५४३ जण उपचार घेत असून, १३५४ बेड शिल्लक आहेत. आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन व जनरल बेडची संख्या पुरेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. रुग्णालयात संपर्क केल्यानंतर बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात येत आहे. यामुळे नातेवाईकांचा गोंधळ वाढू लागला आहे. बेड मिळविण्यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींना संपर्क करावा लागत आहे. दिवसभर धावपळ केल्यानंतर बेड उपलब्ध होऊ लागला आहे. शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. यामुळे उपचारासाठी जायचे कुठे, असा प्रश्न निर्माण होत आहे. महानगरपालिकेच्या डॅशबोर्डप्रमाणे २५५३ जण रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. उर्वरित जवळपास साडेतीन हजार नागरिकांवर घरीच उपचार सुरू आहेत. अशीच स्थिती राहिली, तर पुढील आठवड्यात उपचार वेळेत न मिळणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई