शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

CoronaVirus News: शाळांनी मनमानी फी वसुली बंद करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 11:35 PM

व्यवस्थापनांना निवेदन; दरमहा हप्त्याने शुल्क आकारण्याची मागणी

नवी मुुंबई : कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक ओढाताण सुरू झाली आहे. त्यामुळे महाविद्यालय आणि विद्यालयांनी मनमानी फी वसुली बंद करून, एकरकमी फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर दबाव आणू नये. फी वर्षभर टप्प्याटप्प्याने स्वीकारावी, अशी मागणी शिवसेना नवी मुंबई शाखेच्या वतीने शहरातील शाळा आणि महाविद्यालय व्यवस्थापनाकडे करण्यात आली आहे.कोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून शाळा आणि महाविद्यालयांचा एकही वर्ग भरलेला नाही. वर्ग बंद असले, तरी शाळा आणि महाविद्यालयांनी फी वसुलीचा मात्र सपाटा लावला आहे. आॅनलाइन शिक्षणाच्या नावाखाली काही शाळांनी जास्त फी घेण्यास सुरुवात केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने पालकांवर दबाव निर्माण केला असून, याबाबतच्या तक्रारी शिवसेनेकडे आल्याने शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शहरातील शाळा आणि महाविद्यालय प्रशासनाची भेट घेऊन मनमानी पद्धतीने फी वसुली थांबवण्याच्या सूचना केल्या. पालकांची छळवणूक करून ही फी वसुली सुरू ठेवल्यास, संस्थेच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.कोरोना महामारीमुळे विद्यार्थी घरूनच आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. मात्र, तरीही काही शाळांनी वार्षिक फीमध्ये ग्रंथालय शुल्क, क्रीडा शुल्क, जलतरण तलावाचे शुल्क आणि अन्य शिक्षणेतर उपक्रमांचे शुल्क पालकांच्या माथी मारले जात असून, ही एक प्रकारची आर्थिक लूट असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. सादर लूट तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducationशिक्षण