CoronaVirus News : 'कोव्हिड-१९' चाचण्यांमधील अनागोंदी प्रकरणी एक अधिकारी निलंबित, आयुक्तांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 23:10 IST2020-11-27T23:10:25+5:302020-11-27T23:10:54+5:30
CoronaVirus News : या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

CoronaVirus News : 'कोव्हिड-१९' चाचण्यांमधील अनागोंदी प्रकरणी एक अधिकारी निलंबित, आयुक्तांची कारवाई
नवी मुंबई : चाचणी न करता रिपोर्ट निगेटीव्ह देण्याचा प्रकार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात निदर्शनास आला आहे. या संभाव्य घोटाळा प्रकरणी आयुक्तांनी डॉ. सचिन नेमाडे यांना निलंबित केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने चाचणी न केलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह दिल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी गुरूवारी केला होता. तीन वर्षापुर्वी मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल ही निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट दिला होता. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही केली होती.
या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतली आहे. चाचण्यांची डाटा एंट्रीची जबाबदारी असणारे डॉ. सचिन नेमाणे यांना तत्काळ निलंबित केले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी उपायुक्त योगेश कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.