शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

Coronavirus : पालिका रुग्णालयात प्रशासनाचा निष्काळजीपणा, कक्षाची निर्मिती, परंतु तपासणीच्या सुविधा नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:35 AM

रुग्णालयांमध्ये तपासणी केल्याविना रुग्ण आणि नागरिक ये-जा करीत आहेत. यामुळे पालिका रुग्णालयातील रु ग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

- योगेश पिंगळेनवी मुंबई : कोरोना व्हायरससाठी शासनाच्या निर्देशानुसार नवी मुंबई शहरातील खासगी आणि महापालिका रु ग्णालये सज्ज झाली आहेत. खाजगी रुग्णालयात ये-जा करणाºया नागरिकांना सॅनिटायझर देण्यात येत आहे परंतु महानगरपालिका रु ग्णालयांमध्ये अशाप्रकारे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. रु ग्णालयांमध्ये तपासणी केल्याविना रु ग्ण आणि नागरिक ये-जा करीत आहेत. यामुळे पालिका रु ग्णालयातील रु ग्णांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.पालिका रु ग्णालयात ३८ खाटांच्या आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र ठोस उपाययोजनांचा अभाव असल्याने कोरोनाची लक्षणे वाटत असलेल्या स्वइच्छेने तपासणीसाठी आलेल्या नागरिकांना मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात पाठविले जात आहे.कोरोना व्हायरसमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित नागरिकांची तपासणी व्हावी तसेच त्यांना १४ दिवस देखरेखीखाली ठेवण्यात यावे, असे निर्देश शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहे. त्यानुसार शहरात महापालिकेच्या माध्यमातून महापालिका आणि खासगी रु ग्णालयात विविध कक्षांची स्थापनादेखील करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील खासगी रु ग्णालयात ये-जा करणारे सर्व प्रकारचे रु ग्ण, नातेवाइक आणि नागरिकांना प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी हातावर सॅनिटायझर देण्यात येत असून इतर उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र महापालिका रु ग्णालयात रु ग्ण, नातेवाईक आणि नागरिकांची काळजी घेण्यासाठी कोणत्याही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून तपासणीविनाच नागरिकांचीदेखील ये-जा सुरू आहे. महापालिका रु ग्णालयाशेजारी असलेल्या फोर्टीस रु ग्णालयात येणाºया प्रत्येक नागरिकाची नोंद करून घेण्यात येत असून हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर देण्यात येत आहे. तसेच इतर तपासण्या करूनच रु ग्णालयात प्रवेश देण्यात येत आहे. महापालिका रु ग्णालयात अशा प्रकारच्या सुविधा देण्यात महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांचा मुक्त वावर सुरू असून यामुळे धोका बळावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वाशी येथील रु ग्णालयात ३८ खाटांच्या आयसोलेशन कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोना आजाराशी संलग्न असलेली काही लक्षणे आढळल्यास नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असून शंका दूर करण्यासाठी महापालिका रु ग्णालयात तपासणीसाठी नागरिक येत आहेत, परंतु तपासणीच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगून पालिका रु ग्णालयात येणाºया नागरिकांना मुंबईतील कस्तुरबा रु ग्णालयात जाण्याचा सल्ला पालिका रूग्णालय प्रशासन देण्यात येत आहे.आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाºयावरमहापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाºया आरोग्य कर्मचाºयांना विभागात नव्याने येणाºया नागरिकांच्या तसेच सहलीवरून, बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांच्या नोंदी करण्यात येत आहेत तसेच याबाबतचा दैनंदिन अहवाल पाठविण्याचे काम देण्यात आले आहे.नागरी आरोग्य केंद्रात मास्कचा तुटवडा असल्याने दिवसभर शेकडो नागरिकांच्या संपर्कात येणाºया आरोग्य कर्मचाºयांना मास्क देण्यात येत नाहीत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.कर्मचाºयांची सुरक्षा धोक्यातमहापालिका रु ग्णालयात काम करणाºया सफाई कर्मचाºयांना रु ग्णालयाची स्वच्छता राखावी लागते. या कर्मचाºयांकडे मास्क तसेच हातमौजे उपलब्ध नसल्याने त्यांची सुरक्षादेखील धोक्यात आली आहे. कर्मचाºयांना सुविधा उपलब्ध करण्याची मागणी विविध कामगार संघटनांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल