शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

काँगे्रसचे पदाधिकारी भाजपा, बविआच्या वाटेवर

By admin | Updated: January 3, 2015 23:49 IST

जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे.

दिपक मोहिते - वसईजिल्हापरिषद व पंचायत समितीच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल निर्माण झाली आहे. गटबाजीला कंटाळलेले काही पदाधिकारी भाजपा व बहुजन विकास आघाडीच्या मार्गावर आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणे सुरू केले आहे.काँग्रेस पक्षातील बेदीली आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे. जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकामध्ये उमेदवारी देताना डावलले जाण्याची भीती अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ३ ज्येष्ठ पदाधिकारी भाजप व बहुजन विकास आघाडीच्या वाटेवर आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये घालमेल सुरू झाली. येणाऱ्या जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळेल का? तसेच उमेदवारी मिळाल्यानंतर आपण निवडून येऊ का? असे अनेक प्रश्न इच्छुकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे भाजप व बहुजन विकास आघाडीकडे अनेक उमेदवारांनी चाचपणी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्यामुळे अनेक पदाधिकारी भाजपात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.४गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या अनामत रक्कमा जप्त झाल्यामुळे अनेक पदाधिकारी भाजपात जाण्याची शक्यता असल्याची र्चचा आहे.