शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वीकृत सदस्यत्वासाठी युती-आघाडीत चुरस

By admin | Updated: May 6, 2015 00:52 IST

नवी मुंबई महापालिकेत पाठविण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी युती आणि आघाडीकडून १० जणांनी मंगळवारी अर्ज भरले.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेत पाठविण्यात येणाऱ्या स्वीकृत सदस्यांच्या पाच जागांसाठी युती आणि आघाडीकडून १० जणांनी मंगळवारी अर्ज भरले. यात राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, साबू डॅनिअल यांच्यासह सूरज पाटील व घनश्याम मढवी यांचा समावेश आहे. तर सर्वांनाच धक्का देऊन ज्येष्ठ नगरसेवक विठ्ठल मोरे यांच्यासह अल्पसंख्याकांचा चेहरा असलेले कट्टर शिवसैनिक समीर बागवान यांना डावलून मनोज हळदणकर, राजेश आव्हाड, राजेश शिंदे, विलास लोके यांनी शिवसेनेकडून अर्ज भरले. याशिवाय काँगे्रसकडून अनिल कौशिक आणि भाजपाकडून निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्याविरोधात बंडखोरी करणारे दिलीप तिडके यांनीही अर्ज भरले. संख्याबळानुसार युतीचे दोन आणि काँगे्रस-राष्ट्रवादी-अपक्षांच्या आघाडीचे प्रत्येकी तीन सदस्य निवडून येऊ शकतात.सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीकडून अनंत सुतार आणि महापालिका निवडणूक काळात शिवसेनेच्या बंडखोरांचे नेतृत्व करून एका बंडखोरास निवडून आणणारे घनश्याम मढवी या दोघांची निवड निश्चित मानली जात आहे. तिसऱ्या जागेसाठी सूरज पाटील, साबू डॅनिअल यांच्यासह काँगे्रसकडून अर्ज भरणारे अनिल कौशिक यांच्यात चुरस आहे. राष्ट्रवादीने एक जागा काँगे्रसला सोडली तर कौशिक सभागृहात जाऊ शकतात. मात्र त्यांना पाच अपक्षांची मर्जी जिंकावी लागणार आहे. तर शिवसेनेकडून मनोज हळदणकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. दुसऱ्या जागेसाठी राजेश आव्हाड, राजेश शिंदे, विलास लोके यांच्यासह भाजपाच्या दिलीप तिडके यांच्यात चुरस आहे. त्यातच बंडखोर तिडकेंना भाजपाने स्वीकृत नगरसेवक म्हणून पाठविण्याचा निर्णय घेतल्याने युतीतील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. कारण शिवसेनेने आपल्या ४१ बंडखोरांची हकालपट्टी केली होती. तर उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतरही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पक्षातील बंडखोरांना पक्षातून न काढता अभय दिले होते. त्यातच आता त्यातील एका बंडखोरास स्वीकृत सदस्यासाठी अर्ज भरावा लावल्याने शिवसेनेत तीव्र संताप व्यक्त होत आहे. (खास प्रतिनिधी)