शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसी मुख्यालयासमोर मलनि:सारण वाहिनी बंद

By admin | Updated: November 18, 2016 04:06 IST

एमआयडीसी मुख्यालय ते लोकमत प्रेस दरम्यानची मलनि:सारण वाहिनी रस्ता रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तोडली आहे.

नवी मुंबई : एमआयडीसी मुख्यालय ते लोकमत प्रेस दरम्यानची मलनि:सारण वाहिनी रस्ता रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने तोडली आहे. जवळपास एक वर्षापासून कंपन्यांमधील सांडपाणी जाण्यासाठी वाहिनीच उपलब्ध नाही. एमएमआरडीएच्या ठेकेदाराने काम अर्धवट सोडले असून, त्याचा त्रास येतील नागरिकांना होत असताना एमआयडीसी व महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. एमआयडीसीच्या समोरील रोड व उड्डाणपुलाचे बांधकाम एमएमआरडीएने केले आहे. एक वर्षापूर्वीच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील पुलाचे उद्घाटन केले आहे. पण उद्घाटनानंतरही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. लोकमत प्रेस ते हनुमान नगर दरम्यानचे गटार तोडून ठेवले आहे. गटारातील पाणी रोडवर येवू लागले आहे. एमआयडीसी मुख्यालय, बाजूचा भूखंड ए ८१८, हनुमान नगर व एमआयडीसीच्या मधील कंपनी या सर्वांचे सांडपाणी जाण्यासाठीची वाहिनी तुटली आहे. त्या वाहिनीची दुरूस्ती केलेली नसून कंपन्यांची वाहिन्यांची जोडणी केलेली नाही. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरू लागली आहे. शिवाय एमआयडीसीच्या आवारामध्ये साचलेल्या पाण्यामुळे बाजूच्या ए ८१८ वरील कंपनीची संरक्षण भिंत खचली आहे. खड्डे व रखडलेल्या रूंदीकरणामुळे वाहतूक कोंडी होत असून रोज एक तरी अपघात होत आहे. या ठिकाणी रस्ता, गटार, मलनि:सारण वाहिनी व इतर अनेक कामे अर्धवट राहिलेली आहेत. रस्ता बांधणाऱ्या ठेकेदाराने डेब्रिजही उचलले नाही. येथील स्थिती अत्यंत गंभीर झाली असून त्याकडे सर्वच यंत्रणा दुर्लक्ष करत आहेत. एमएमआरडीएचे अधिकारी ठेकेदारावर कारवाई करत नाहीत. महापालिका व एमआयडीसीचे अधिकारी आमची जबाबदारी नसल्याचे कारण देवून या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत. यामुळे याविषयी राज्य शासनाकडे तक्रार करण्याची तयारी नागरिकांनी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)