शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला दे धक्का; गणेश नाईकांचा खास माणूस ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 21:53 IST

नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी; महाविकास आघाडीनं कंबर कसली

नवी मुंबई: राज्यात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळवल्यानंतर आता महाविकास आघाडीनं नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. महापालिका निवडणुकीत भाजपाला पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीनं नवी मुंबईतले भाजपाचे दिग्गज नेते गणेश नाईक यांना धक्के देण्यास सुरुवात केली आहे. नाईक यांचे खंदे समर्थक मानले जाणारे सुरेश कुलकर्णी ४ नगरसेवकांसह शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं वृत्त 'एबीपी माझा'नं दिलं आहे. एप्रिलमध्ये नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होत आहे. त्याआधी गणेश नाईक यांना शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं जोर लावला आहे. नवी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी महाविकास आघाडीनं कंबर कसली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत तळ ठोकला आहे. गणेश नाईक यांच्या नवी मुंबईतल्या वर्चस्वाला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनं भाजपा नगरसेवकांकडे मोर्चा वळवला आहे. नाईक यांचे विश्वासू समजले जाणारे सुरेश कुलकर्णी ४ नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश करू शकतात. कुलकर्णी यांनी तीनवेळा स्थायी समितीचं सभापतीपद भूषवलं आहे.उद्या तुर्भे भागात सुरेश कुलकर्णी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना नेते एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा उपस्थित राहणार आहेत. कुलकर्णी यांचं तुर्भे परिसरात वर्चस्व आहे. या भागातून ८-९ नगरसेवक निवडून येतात. त्यामुळे कुलकर्णी यांच्या पक्ष प्रवेशामुळे या भागात शिवसेनेला बळ मिळू शकतं. महाविकास आघाडी झाल्यानंतरची पहिलीच महापालिका निवडणूक असल्यानं शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसनं संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. 

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाGanesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेNCPराष्ट्रवादी काँग्रेस