शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चार वर्षांत सिडको बांधणार २ लाख १0 हजार घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:22 AM

सर्वसामान्यांसाठी ९५हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे.

नवी मुंबई : सर्वसामान्यांसाठी ९५हजार घरांची घोषणा केल्यानंतर सिडकोने आता आणखी १ लाख १0 हजार घरे निर्माण करण्याचे जाहीर केले आहे. गेल्या महिन्यात राज्य सरकारने या महागृहनिर्माण योजनेस मंजुरी दिली होती. त्यानंतर सिडकोच्या संचालक मंडळाने सुद्धा या महागृहनिर्मिती योजनेला मंजुरी दिली आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या ९५ हजार घरांसह आता नव्याने मंजुरी मिळाली १ लाख १0 हजार अशी जवळपास २ लाख १0 हजार घरे पुढील चार वर्षांत टप्प्याटप्प्याने निर्माण केली जाणार आहेत.परिवहन केंद्रीत विकास संकल्पनेवर सिडकोने सध्या ९५ हजार घरांचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी तब्बल १९ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ९ हजार २४९ घरांच्या आॅनलाइन नोंदणीचा ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ९५ हजार घरांपाठोपाठ आता यात १ लाख १0 हजार घरांची भर पडणार आहे. त्यामुळे पुढील चार वर्षांच्या काळात सर्वसामान्यांसाठी सिडकोच्या माध्यमातून जवळपास २ लाख १0 घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.नव्याने समावेश मंजूर करण्यात आलेली १ लाख १0 हजार घरे एमआयडीसी क्षेत्रातील पावणे, तुर्भे, बोनसरी, कुकशेत व शिरवणे येथील बंद पडलेल्या दगडखाणीच्या जागेवर बांधण्यात येणार आहेत. यात ६२ हजार ९७६ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर ४७ हजार ४0 घरे अल्प उत्पन्न घटकांसाठी असणार आहेत. सध्या सुरू करण्यात आलेल्या ९५ हजार घरांच्या गृहप्रकल्पात ५३,४९३ घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तर उर्वरित ३६,२८८ घरे अल्प उत्पन्न गटासाठी आहेत. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधणार आहेत.