महिनाअखेरीस सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 09:31 IST2025-06-11T09:31:27+5:302025-06-11T09:31:47+5:30

Navi Mumbai: जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.

CIDCO lottery for 22,000 houses by the end of the month? | महिनाअखेरीस सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी?

महिनाअखेरीस सिडकोची २२ हजार घरांसाठी लॉटरी?

नवी मुंबई - जून महिनाअखेरीस विविध नोडमधील २२ हजार घरे विक्रीसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. बुधवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मागील गृहयोजनेतील शिल्लक राहिलेल्या १६ हजार घरांचासुद्धा यात समावेश केला जाणार आहे. 

सिडकोने अलीकडेच काढलेल्या २६ हजार घरांच्या विक्री योजनेला विविध कारणांमुळे अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. असे असले तरी सोडतीत यशस्वी ठरलेल्या जवळपास दहा हजार ग्राहकांनी घराचा पहिला हप्ता भरला आहे. हा प्रतिसाद समाधानकारक असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

सहा हजार नवीन घरांचा समावेश 
या योजनेतील शिल्लक राहिलेल्या १६ हजार घरांसह नवीन सहा हजार घरांचा समावेश करण्याचे नियोजन असल्याचे समजते.  संचालक मंडळाच्या बैठकीत नवीन घरांची संख्या कमी-जास्त होण्याची शक्यतासुद्धा सूत्रांनी व्यक्त केली. या याेजनेत वाशीसह जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणागिरी या नोडमधील घरांचा समावेश केला होण्याची शक्यता आहे.

Web Title: CIDCO lottery for 22,000 houses by the end of the month?