अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 09:42 IST2025-05-18T09:42:05+5:302025-05-18T09:42:25+5:30
नवीन पनवेल : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अत्याचारप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल, धमकी देऊन पाच लाख उकळले
नवीन पनवेल : महिला पोलिसावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षकावर पनवेल तालुका पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या आईलाही सहआरोपी करण्यात आले आहे.
मार्च २०२० मध्ये आरोपी पोलिस उपनिरीक्षकाची ओळख तो तळोजा पोलिस ठाण्यात कार्यरत असताना महिला पोलिसासोबत झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. मार्च २०२० मध्ये चहा पिण्याच्या बहाण्याने त्याने पोलिस महिलेस भावाच्या महालक्ष्मीनगर, नेरे येथील रूमवर नेले. तेथे गुंगीचे औषध टाकून तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचे अर्धनग्न फोटो काढले. ते फोटो व्हायरलची धमकी देऊन आत्महत्या करण्याचीही धमकी दिली.
धमकी देऊन पाच लाख उकळले
एप्रिल २०२० ते एप्रिल २०२५ यादरम्यान करंजाडे येथे पीडित महिलेवर अत्याचार केला, तसेच चारचाकी गाडीसाठी तिच्याकडे पाच लाखांची मागणी केली. ते न दिल्यास तिचे अर्धनग्न फोटो तिच्या मुलाला दाखविण्याची धमकी देत तिच्याकडून दोन लाख ऑनलाइन आणि तीन लाख रोख स्वरूपात घेतले.
पीडित महिलेला जातीवाचक शिवीगाळही केली. पीडितेने याबाबतची माहिती पोलिस उपनिरीक्षकाच्या आईला दिली असता तिनेही जातीवरून शिवीगाळ केली.