रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 06:37 AM2021-12-13T06:37:43+5:302021-12-13T06:38:03+5:30

सिग्नल तोडल्याने दुर्घटना 

A car accident while trying to save a rickshaw driver died | रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा भीषण अपघात; चालकाचा मृत्यू

googlenewsNext

नवी मुंबई : सिग्नल तोडून रस्ता ओलांडणाऱ्या रिक्षाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारचा अपघात झाल्याची घटना पामबीच मार्गावर घडली. यामध्ये कार चालकाचा मृत्यू झाला असून इतर पाचजण जखमी झाले आहेत. अपघातावेळी कार प्रचंड वेगात असल्याने त्यावर नियंत्रण न मिळवता आल्याने कार पाच ते सातवेळा उलटून विरुद्ध दिशेच्या मार्गावर आदळली.

पामबीच मार्गावर अक्षर चौकात रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वाशीकडून सीबीडीकडे जाणारी भरधाव कार अक्षर चौकात सिग्नल ओलांडत होती. त्यावेळी सिग्नल लागलेला असतानाही सिग्नल तोडून एक रिक्षा रस्ता ओलांडत होती. अचानक समोर आलेल्या रिक्षाला धडक टाळण्यासाठी कार चालकाने कार वळवली. मात्र कार अधिक वेगात असल्याने कारवर नियंत्रण मिळवता न आल्याने कारची रिक्षाला धडक बसली. त्यानंतर कार पाच ते सात वेळा उलटून घेऊन दुभाजक तोडून विरुद्ध दिशेच्या लेनवर जाऊन आदळली. यावेळी कारमध्ये चालकासह चार व्यक्ती होत्या असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. त्यापैकी दोघेजण कार उलटत असतानाच कारमधून पडून जखमी झाले. अपघातामध्ये कार चालकाचा कारमध्येच चेंगरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपघातानंतर प्रत्यक्षदर्शींनी व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे पामबीच मार्गावरील बेशिस्त वाहतूक पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे. तर अक्षर चौकात सातत्याने अपघात होत असल्याने त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर बागवान यांनी केली आहे.

Web Title: A car accident while trying to save a rickshaw driver died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.