खारघरमध्ये कारचा अपघात; कार पडली थेट पाण्यात, एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 15:35 IST2025-11-15T15:34:51+5:302025-11-15T15:35:43+5:30
कार थेट पाण्यात कोसळल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

खारघरमध्ये कारचा अपघात; कार पडली थेट पाण्यात, एकाचा मृत्यू
मयुर तांबडे
नवीन पनवेल : सायन पनवेल महामार्ग खारघर खाडी पुलावरून एक पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला आणि कार थेट पाण्यात कोसळली. यात एकाचा मृत्यू झाला.
१४ नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिली. त्याला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आले. या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. अग्निशामक दलाच्या मदतीने या गाडीला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.