शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

शीळफाटाप्रकरणी जामीन रद्द करा

By admin | Updated: November 13, 2014 01:41 IST

मुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या महापालिका अधिकारी आणि बिल्डर अशा 15 जणांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणो पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ठाणो : मुंब्रा-शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी जामिनावर बाहेर असलेल्या महापालिका अधिकारी आणि बिल्डर अशा 15 जणांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणो पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच या दुर्घटनेचा निकाल तातडीने लावण्यासाठी विशेष न्यायालयाची निर्मिती करावी, अशी मागणीही केल्याची माहिती सूत्रंनी दिली.
 अल्प कालावधीत मुंब्रा-शीळफाटा परिसरातील लकी कम्पाउंडमध्ये आदर्श ए आणि बी या दोन इमारती उभारण्यात आल्या होत्या. त्यापैकी बी इमारत 4 एप्रिल 2क्13 रोजी कोसळली. या दुर्घटनेत 74 जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले होते. याप्रकरणी मिळालेल्या नोंदवहीवरून पोलिसांनी 28 जणांविरोधात गुन्हा दाखल करून आतार्पयत 25 जणांना अटक केली. त्यामध्ये इमारतीच्या मुख्य बिल्डरांसह त्यांचे भागीदार, महापालिका अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. अटक के लेल्या आरोपींपैकी 19 जण सध्या जामिनावर आहेत. तत्कालीन महापालिका उपायुक्त दीपक चव्हाण यांच्यासह स्थानिक नगरसेवक हिरा पाटील आदींची ठाणो आणि मुंबई न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. त्यापैकी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिलेल्या 15 जणांचे जामीन रद्द करण्यासाठी ठाणो पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने महापालिका अधिकारी आणि बिल्डरांचा समावेश असल्याचे सूत्रंनी सांगितले. 
 
शीळफाटा दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन यातील आरोपींना जामीन न मिळता ते कोठडीत असणो अपेक्षित होते. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जाला मंजुरी दिली. त्याच निर्णयाविरोधात 15जणांचे जामीन रद्द होण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील  शिशिर हिरे यांनी दिली.