शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाईवर बोअरवेलचा उतारा

By admin | Updated: December 24, 2015 01:39 IST

शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालिका नव्याने ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविणार आहे. जुन्या बोअरवेलसह विहिरीची दुरूस्ती करून तेथे विद्युत पंप मशिन बसविण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. यामुळे २४ तास पाणी सेवा देण्याचे स्वप्न भंगले असून भरारी पथकही कागदावरच आहे. उल्हासनगरात पाणीटंचाईच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरल्याने नगरसेवकांसह पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. आयुक्त मनोहर हिरे यांनी प्रभागनिहाय पालिका अधिकारी यांच्यासह नगरसेवक, नागरिकांसोबत बैठका घेवून टंचाईतून मार्ग काढण्यायचा प्रयत्न चालविका आहे. यानुसार पाणीपुरवठा सभापती ज्योती गायकवाड, विभागाचे कार्यकारी अभिंयता कलई सेलवन, बी.एस. पाटील, उपमहापौर पंचशिला पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ३०० पेक्षा जास्त बोअरवेल बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.पाणीटंचाईमुळे दबंग नगरसेवक वॉलमेनला हाताशी धरून पाणी पळवित आहेत. पाणी पळवापळवी करणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अरूण अशान यांनी केली आहे. पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी तत्कालिन आयुक्त बालाजी खतगावकर यांनी २४ तास सेवा व भरारी पथकाची संकल्पणा मांंडली होती. काही महिने ती सुरू झाली होती. मात्र त्यानंतर ही संकल्पना गायब होऊन भरारी पथकही दिसेनासे झाल्याचा आरोप होत आहे. (प्रतिनिधी)