शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

भाजपा-शिवसेनेचे 100 अपराध भरले; त्यांचे पानीपत अटळ - धनंजय मुंडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2019 21:53 IST

समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानीपत अटळ आहे

 नवी मुंबई - समाजातला एकही घटक तुमच्यावर खुश नाही, शिशुपालासारखे तुमचे 100 अपराध भरले आहेत. त्यामुळे तुम्ही आता एकत्र लढा की वेगळे लढा तुमचे पानीपत अटळ आहे, अशा शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपा शिवसेनेच्या सरकारवर हल्लाबोल केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या आजच्या तिस-या दिवशीची पहिली व एकूण पाचवी सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मोठ्या उत्साहात पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या अतिशय आक्रमक भाषणात मुंडे यांनी सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला.

पाच दिवस उलटूनही बेस्टचा संप सुरूच आहे. प्रवासासाठी लोकांना जास्त पैसे खर्च करावे लागत आहे. काय करतेय पालिका, परिवहन खातं? कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाई होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेस उभी राहील. प्रसंगी रस्त्यावरही उतरेल असा इशारा त्यांनी दिला.

भाजपाच्या सोळा मंत्र्यांचा नव्वद हजार कोटींचा घोटाळा मी पुराव्यानिशी समोर आणला. त्याची चौकशी झाली नाही. माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की चौकशी लावा, जर पुरावे खोटे निघाले तर मला महाराष्ट्राच्या कोणत्याही चौकात फाशी द्या असे आव्हान सरकारला देतांना सामाजिक न्याय मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपमध्ये पैसे खाल्ले, आदीवासी मंत्र्यांनी आदीवासी लोकांसाठीच्या साहित्यात पैसे खाल्ले. अहो या लोकांनी लहान लेकरांच्या चिक्कीतही पैसे मारले. आणि कसला तुमचा पारदर्शी कारभार? असा सवाल केला.

लोकांना रेशनवर धान्य मिळत नाही आणि हे ऑनलाईन घरपोच दारू विकायला निघाले आहेत.  जमीन विकून मिळालेला पैसा खिशात राहत नाही, पावडर खाऊन कमावलेली बॉडी कधी टिकत नाही, आणि लाटेत निवडून आलेला आमदार पुन्हा कधी निवडून येत नाही. अशा शब्दात भाजपाच्या लाटेची खिल्ली उडवली. 

या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेच्या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील,  माजी मंत्री गणेश नाईक, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार विदया चव्हाण, आमदार हेमंत टकले, आमदार शशिकांत शिंदे, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक,विदयार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफार मलिक, सेवादल प्रदेशाध्यक्ष दिपक मानकर,जिल्हाध्यक्षा अनंत सुतार, महापौर जयवंत सुतार महिला जिल्हाध्यक्षा विदया सुतार आदींसह नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNavi Mumbaiनवी मुंबई