भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 11:48 IST2021-03-17T11:47:01+5:302021-03-17T11:48:31+5:30
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.

भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळे निधन
ठळक मुद्देराज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.
पनवेल : पनवेल महानगरपालिकेतील भाजपचे विद्यमान नगरसेवक संजय भोपी यांचे आज रोजी निधन झाले. गेल्या दोन महीन्यापासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. कोरोनाची लागण झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारा दरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.
राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कडक निर्बंध लादण्यात आले असून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे, प्रशासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढाईला पुन्हा सज्ज झाली आहे.