लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार
By नारायण जाधव | Updated: July 14, 2023 18:53 IST2023-07-14T18:53:25+5:302023-07-14T18:53:38+5:30
कारने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला आहे.

लुघशंका करण्यास हटकल्याने बार व्यवस्थापकास कारने फरफटत नेले, तुर्भे येथील धक्कादायक प्रकार
नवी मुंबई : तुर्भे येथील बिअर बार लघुशंका करण्यास हटकल्याचा राग येऊन एका टोळक्याने बारच्या व्यवस्थापकास एक कि.मी.पर्यंत कारने फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही फुटेजवरून उघड झाला आहे. याप्रकरणी त्या टोळक्याविरोधात एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. तुर्भे येथील म्युझिक बारमध्ये रात्री दहाच्या सुमारास ही घटका घडली. येथे एका कारमध्ये चौघेजण आले. त्यातील दोघांनी मद्य आणि खाण्याच्या काही वस्तू विकत घेतल्या.
त्यावेळी त्यांच्यातील एकाने कारमधून खाली उतरून हॉटेलबाहेरच लघुशंका केली. हे व्यवस्थापकाने पहिल्याने त्याने लगेच बाहेर येऊन त्यास लघुशंका करण्यास मज्जाव केला. त्यावरून त्यांची बाचाबाची झाली तेवढ्यात शेजारील दुकानदाराने तेथे येऊन जाब विचारला. त्यामुळे चौघांनी त्या दोघांना मारहाण करून ते लगेच गाडीत बसले. कारसमोरच काही अंतरावर हॉटेल व्यवस्थापक उभा होता. चालकाने अचानक कार सुरू त्याच्या अंगावर घातल्याने व्यवस्थापकाने बोनेटला पकडले. मात्र, तशाच अवस्थेत कारचालकाने ती पुढे नेली. शीव-पनवेल मार्गावर वळण घेताना बोनेट पकडून असलेले व्यवस्थापक खाली पडले. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात मुका मार लागला आहे. यानंतर त्या टोळक्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.