शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

मालासह कंटेनर चोरणारी टोळी अटकेत

By admin | Updated: December 22, 2015 00:45 IST

कंटेनरचालकाला धाक दाखवून मालासह कंटेनर चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा कंटेनर व त्यामधील होंडा कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट

नवी मुंबई : कंटेनरचालकाला धाक दाखवून मालासह कंटेनर चोरून नेणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा कंटेनर व त्यामधील होंडा कंपनीच्या वाहनांचे स्पेअर पार्ट असा ३० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले तिघेही सराईत गुन्हेगार असून, पनवेल परिसरातील राहणारे आहेत.कंटेनरचालक किसनपाल यादव (४२) यांच्यासोबत शनिवारी पहाटे ही घटना घडली होती. आशू ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रेलर घेऊन ते पनवेलमधील कोनगाव येथे चालले होते. यावेळी कंटेनरमध्ये होंडा कंपनीच्या वाहनांचे १६ लाख रुपये किमतीचे स्पेअरपार्ट्स होते. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धानसर टोलनाक्यालगत कंटेनर पोचला असता, पाठीमागून इको कारमधून आलेल्या तिघांनी कंटेनर पळवून नेला होता. कार आडवी लावून कंटेनर थांबल्यानंतर यादव यांना चाकूचा धाक दाखवून त्यांचे हातपाय बांधून तिघांनी त्यांना निर्जन स्थळी सोडले होते. यानंतर त्यांनी घटलेल्या प्रकाराची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत व परिमंडळ २ चे उपायुक्त विश्वास पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन तपास पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी २४ तासांच्या आत तिघांना अटक करून त्यांच्याकडून कंटेनर व स्पेअरपाटर््स असा ३० लाख रुपये किमतीचा लुटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अजितसिंग सिंग (२८), मंगलप्रसाद वर्मा (२२) व रोशन यादव (२३) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघे पनवेलमधील खुराटी, रोहंजन व पेंधर गावचे राहणारे आहेत. तर त्यांनी गुन्ह्यासाठी वापरलेली इको (एमएच ४६ डब्लू ९४४८) कारदेखील पोलिसांनी जप्त केली आहे. त्यांचा चौथा साथीदार फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त दिलीप सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी साहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्यासह तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)