शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होऊ देणार नाही

By admin | Updated: November 18, 2016 03:54 IST

डंपिंग ग्राऊंडमुळे तुर्भे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

नवी मुंबई : डंपिंग ग्राऊंडमुळे तुर्भे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाचव्या सेलची क्षमता संपल्यामुळे तो तत्काळ बंद करण्यात यावा. डंपिंग बंद होईपर्यंत महासभा होवू देणार नाही, असा इशारा माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे. नगरसेवकांच्या असंतोषामुळे सर्वसाधारण सभा तहकूब करावी लागली. तुर्भे डंपिंग ग्राऊंडच्या प्रश्नाचे तीव्र पडसाद गुरूवारी सर्वसाधारण सभेमध्ये उमटले. राष्ट्रवादी काँगे्रसचे नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेवून डंपिंग बंद करण्याची मागणी केली. डंपिंगमुळे तीव्र दुर्गंधी पसरू लागली आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. साथीचे आजार वाढले आहेत. आम्ही आतापर्यंत खूप सहन केले, यापुढे सहन केले जाणार नाही.नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका अशा शब्दात नगरसेवकांनी सुनावले. जोपर्यंत डंपिंग बंद केले जात नाही तोपर्यंत महासभा होवू दिली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्यासाठी जमिनीवर बसून आंदोलन केले जाईल. वेळ पडली तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष अनंत सुतार, शुभांगी पाटील, पूजा मेढकर, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी यांच्यासह इतर नगरसेवकांनीही डंपिंग हटावचा नारा दिला. संतप्त नगरसेवकांनी विषयपत्रिका फाडून सभागृहात फेकल्या. तत्काळ निर्णय जाहीर करावा, असे स्पष्ट केले. महापौर सुधाकर सोनावणे यांनी नगरसेवकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने आम्ही आता माघार घेणार नाही. आतापर्यंत शांततेच्या मार्गाने निवेदन, मोर्चे काढूनही काहीच मार्ग निघालेला नसल्याने आता डंपिंग बंद करेपर्यंत महासभा होवू देणारच नसल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केले. नगरसेवक आक्रमक झाल्याने महापौर सुधाकर सोनावणे यांनी सभा तहकूब केली. डंपिंग ग्राऊंडवर शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट केली जात असल्याचा दिखावा केला जात आहे. आंदोलन केले, प्रसारमाध्यमांनी आवाज उठविल्यानंतर काही दिवस साफसफाई केली जाते, पण नंतर सर्व कामकाज ठप्प झालेले असते. फक्त दिखावेगिरी सुरू असल्यामुळे आता यापुढे माघार घेतली जाणार नसल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले. पाचव्या सेलची क्षमता संपली आहे. पर्यायी व्यवस्था करण्यात अपयश आल्यामुळे तेथे अतिरिक्त कचरा टाकला जात असल्याबद्दलही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)