शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बंद दगडखाणीच्या जागेवर डांबर प्लांट

By admin | Updated: January 4, 2016 02:12 IST

तुर्भे नाक्यावरील संजीवन क्वॉरीच्या जागेवर पाच वर्षांपासून डांबर प्लांट सुरू झाला आहे. महापालिका व एमआयडीसीने पाणीपुरवठा दिलेला नसताना व कंपनीच्या नावाने

नामदेव मोरे,  नवी मुंबईतुर्भे नाक्यावरील संजीवन क्वॉरीच्या जागेवर पाच वर्षांपासून डांबर प्लांट सुरू झाला आहे. महापालिका व एमआयडीसीने पाणीपुरवठा दिलेला नसताना व कंपनीच्या नावाने अधिकृत वीजजोडणी नसूनही हा प्रकल्प सुरू आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारी व प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नोटीसनंतरही दोन्ही प्रशासनांनी अद्याप काहीच कारवाई केलेली नाही. नवी मुंबई परिसरात सुरू झालेल्या विकासकामांना दगड, खडी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी सिडको व जिल्हाधिकारी कार्यालयाने दिघा ते नेरूळपर्यंत दगडखाणींना परवानगी दिली आहे. तुर्भे नाका फायझर कंपनीला लागून संजीवन कन्स्ट्रक्शन कंपनीला दगडखाणीसाठी जागा दिली होती. मागील काही वर्षांपासून ही कंपनी बंद आहे. परंतु जवळपास २०१० पासून या जागेवर लिंटेच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने डांबर बनविण्याचा प्लांट उभा केला आहे. वास्तविक दगडखाणीची जागा इतर व्यवसायासाठी वापरता येत नाही. ही लागा भाडेतत्त्वावरही देता येत नाही. असे असताना संजीवन कंपनीचे प्रमुख जयप्रकाश जगताप यांनी संबंधित कंपनीशी भागीदारीचा करार केला आहे. वास्तविक मूळ जागामालक जगताप असताना त्यांची भागीदारी फक्त १ टक्के आहे व लिंटेच इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीची भागीदारी ९९ टक्के आहे. आर्थिक व्यवहाराचे पूर्ण अधिकार लिंटेचलाच देण्यात आले आहेत. कंपनीविषयी काहीही प्रकरण झाल्यास त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच आहे. वास्तविक दगडखाणीची जागा ही संबंधित व्यक्तीला भाडेतत्त्वावर दिलेली असते. दगडखाणी संपल्यानंतर ती पुन्हा शासनाच्या हवाली करणे आवश्यक आहे. परंतू संजीवन कंपनीची दगडखाण बंद झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या कंपनीशी भागीदारीत डांबर प्लांट टाकण्यात आला आहे. लिंटेच व इतर कंपन्यांमुळे या परिसरातील प्रदूषण वाढू लागले आहे. याविषयी आदर्श सेवाभागी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, एमआयडीसी, जिल्हा अधिकारी कार्यालय, महावितरणकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु कोणीच संबंधितांवर कारवाई करीत नाही. गट नंबर ३७७ वर ही कंपनी सुरू करण्यात आली आहे. एमआयडीसीकडे याविषयी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की ही जागा १४ आॅक्टोंबर १९७४ मध्ये एमआयडीसीने ताब्यात घेतली आहे. त्यावर सद्य:स्थितीमध्ये एमआयडीसीचा ताबा असून तिचे वाटप कोणत्याही एजन्सीला केलेले नाही. कोणत्याही कंपनीला जागा दिलेली नसल्याने त्यांना नळजोडणी देण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जागेवर मालकी हक्क दाखविणाऱ्या एमआयडीसीने अद्याप या ठिकाणी असलेला प्लांट कसा सुरू झाला व आतापर्यंत त्यांनी पाणी कोठून वापरले, याविषयी साधी विचारपूसही केलेली नाही. महापालिका व एमआयडीसी प्रशासन येथील अतिक्रमणावरही काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. तक्रारदाराच्या जीवाला धोकातुर्भे नाक्यावरील डांबर, सिमेंट प्लांटमुळे परिसरात प्रदूषण वाढले आहे. महावितरणने वीजपुरवठा दिलेला नसताना व एमआयडीसीसह पालिकेने पाणी दिलेले नसताना प्लांट सुरू असून, याविषयी शिवाजी जाधव यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, एमआयडीसी व जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत. यामुळे काही समाजकंटकांकडून त्यांना धमकावले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केल्यामुळे जीवाला धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली असून, याविषयी पोलीस आयुक्तांसह राज्य शासनाकडे अर्ज देणार असल्याचेही सांगितले आहे.