शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यातील गौण खनिज उत्खननाला चाप

By admin | Updated: November 28, 2015 01:10 IST

तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकाने चाप लावला आहे. गेल्या तीन महिन्यांत शंभरपेक्षा जास्त प्रकरणे या पथकाने बाहेर काढली आहेत

पनवेल : तालुक्यात बेकायदा गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांना गौण खनिज पथकाने चाप लावला आहे. गेल्या तीन महिन्यांत शंभरपेक्षा जास्त प्रकरणे या पथकाने बाहेर काढली आहेत. त्याच्याबरोबर त्यांच्याकडून पावणे तीन कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आणि आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून प्राप्त झाली आहे. पनवेल मुंबईपासून अगदी जवळ असलेला रायगड जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण तालुका आहे. सिडकोमुळे या भागाचा झपाट्याने विकास झाला, त्याचबरोबर प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या परिसराचा चेहरामोहराच बदलत आहे. नागरीकरणाचे लोन ग्रामीण भागात पसरले असून टोलजंग इमारती ठिकठिकाणी उभ्या राहत आहेत. बांधकामाकरिता मोठ्या प्रमाणात रेती, दगड आणि खडीची मागणी असल्याने या भागातील दगडखाणी त्याचबरोबर खडी क्र शर गेल्या काही वर्षात अतिशय तेजीत आहेत. त्याचबरोबर रेतीची मागणी पूर्ण करण्याकरिता वाघिवली, गणेशपुरी, उलवे, ओवळा, पारगाव, बेलपाडा या भागातील खाडीप्रवण क्षेत्रातून रेती उपसा होत होता. गेल्या काही वर्षात रेती माफियांनी मोठ्या प्रमाणात खाडी पोखरून रेतीचा उपसा केला आहे. मात्र याविरोधात जिल्हाधिकारी शीतल उगले- तेली यांच्या आदेशानुसार तहसीलदार दीपक आकडे आणि गौण खनिज पथकाचे प्रमुख नायब तहसीलदार बी.टी. गोसावी यांनी गेल्या महिन्यापासून मोहीमच उघडली आहे. त्यांनी काही दिवसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत धाडी टाकून रेती माफियांना सळो की पळो करून सोडले आहे. शेकडो ब्रास रेती जप्त केलीच त्याचबरोबर वाहतूक करणारे वाहने, सक्शन पंप, बार्ज हस्तगत केले. त्याचबरोबर खारघर, कामोठे, एनआरआय, नवीन पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. एकंदरीत गेल्या एक -दोन महिन्यापासून रेती उपासा जवळपास बंद करण्यास या पथकाला यश आले आहे. त्याचबरोबर विविध प्रकल्प, कारखाने, बांधकामासाठी उत्खनन केले जाते त्यांच्यावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. (वार्ताहर)