शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

पनवेल तालुक्यात 71 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत, ३५ जागांवर महिला सरपंच बसणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 8:32 AM

पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत.

पनवेल : तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या २४ ग्रामपंचायतींसह एकूण ७१ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी फडके नाट्यगृहात पार पडली. या सोडतीसाठी नव्याने निवडून आलेल्या २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या सोडतीबाबत नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांमध्ये उत्साह पहायला मिळाला. तर, मनासारखे आरक्षण न मिळाल्याने अनेकजण नाराज असल्याचेही दिसले.पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या अध्यक्षतेखाली व तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. काही ग्रामपंचायतीच्या चिठ्ठ्यांवर सोडत काढण्यात आली. ७१ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदापैकी ३५ जागेवर महिला सरपंच बसणार आहेत. हे आरक्षण जाहीर करताना २०११च्या जनगणनेचा विचार करण्यात आला. मागील १५ वर्षात पाली देवद ग्रामपंचायतीवर ओबीसी महिला सरपंच  नसल्याने माजी पंचायत समिती सभापती राजेश केणी यांनी सोडतीदरम्यान आक्षेप घेतला. येथील आरक्षणाची सोडत चिठ्ठीद्वारे होणार होती. केणी यांच्या आक्षेपाची प्रांत अधिकारी नवले यांनी दखल घेत पाली देवद ग्रामपंचायतीवर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित करण्यात आले.या सोडतीदरम्यान महिला आरक्षण पडलेल्या जागांवर अनेकांनी आक्षेप घेत आरक्षण बदलण्याची विनंती प्रांत अधिकारी दत्तात्रेय नवले यांच्याकडे केल्याचे दिसले. मात्र संबंधित आरक्षण कायद्याच्या निकषानुसारच असल्याचे यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट केल्यावर आक्षेप घेणाऱ्यांचे समाधान झाले. लॉबिंग सुरू -सरपंच पदासाठी अनेकांचे लॉबिंग सुरू होणार आहे. विशेषतः १९ ग्रामपंचायतींवर पडलेल्या सर्वसाधारण जागांसाठी मोठ्या प्रमाणात इच्छुक पुढे येण्याची शक्यता आहे.

असे असेल आरक्षण - - अनुसूचित जाती - बारवई,- अनुसूचित जमाती- पोयंजे, मोरबे, वाकडी, सांगुर्ली, वारदोली, हरिग्राम,- नागरिकांचा मागास प्रवर्ग- गिरवले, कसळखड, चिखले, विचुंबे, देवद, कराडे खुर्द, नांदगाव, चिपळे, पाले-बु., केळवणे,- सर्वसाधारण- ओवळे, दुंदरे, न्हावे, मलडुंगी, जांभिवली, शिरवली, आदई, पारगाव, गव्हाण, वडघर, सावळे, खेरणे खु., शिवकर, करंजाडे, वाघिवली, चिंद्रण, नेरे, कानपोली, भातण,- अनुसूचित जाती महिला -तरघर,- अनुसूचित जमाती महिला- भिंगार, उसर्ली, तुराडे, चावणे, उलवा, खानावळे- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -गुळसुंदे, वावेघर, कर्नाळा, पोसरी, पाली देवद, वलप, केवाळे, उमरोली, शिरढोण,- सर्वसाधारण महिला - कोन, सोमाटणे, दापोली, कुंडेवहाळ, वावंजे, वांगणीतर्फे वाजे, वहाळ, पळस्पे, नानोशी, कोळखे, साई, वाजे, आकुर्ली, खैरवाडी, खानाव, आपटा, देवळोली बु., नितळस, दिघाटी.

सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडली आहे. सरपंच पदासाठी निवडणुकीचा कार्यक्रम शासनामार्फत जाहीर झाल्यावर याठिकाणी निवडणुका घेतल्या जातील.- दत्तात्रेय नवले, प्रांत अधिकारी, पनवेल 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतpanvelपनवेलsarpanchसरपंच