विकास आराखड्याला पनवेलच्या महासभेत मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:22 AM2019-11-27T02:22:16+5:302019-11-27T02:22:33+5:30

महापालिकेचा शहर सुनियोजन विकास आराखडा तयार झाला असून बुधवारी झालेल्या महासभेत त्याला मंजुरी देण्यात आली.

Approval of development plan in Panvel General Assembly | विकास आराखड्याला पनवेलच्या महासभेत मंजुरी

विकास आराखड्याला पनवेलच्या महासभेत मंजुरी

Next

पनवेल : महापालिकेचा शहर सुनियोजन विकास आराखडा तयार झाला असून बुधवारी झालेल्या महासभेत त्याला मंजुरी देण्यात आली. भविष्यात पनवेल महापालिकेच्या विकासासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, याकरिता आवश्यक निधीचा लेखाजोखा या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मांडण्यात आला आहे.

महापालिका हद्दीतील नागरिकांच्या सर्वांगीण गरजा पूर्ण करण्यासाठी तब्बल दहा हजार कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद केले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी, शहर सुनियोजन विकास आराखडा बनविण्याला प्राधान्याने सुरुवात केली.
वर्षभरापासून सुरू असलेले काम अखेर पूर्ण झाले आहे. शहरात नागरी, सामाजिक, मूलभूत सुविधांचा अभ्यास, भविष्यात शहराला कशाची गरज आहे, सद्यस्थितीत महापालिका कोणत्या गोष्टीचा विकास करू शकते, आदीचा अहवाल बनविण्यात आला आहे.

क्रिसिल रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन लिमिटेड या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सदस्य नगरसेवक, वकील, डॉक्टर, सेवाभावी संस्था, रिक्षा संघटना यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून प्रत्येकांचे मत नोंदवून अहवाल तयार केला आहे.

पनवेल महापालिकेकडे सध्या अस्तित्वात असलेल्या बाबींचा विचार करून भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, बागबगिचे, पाणी, रस्ते, ड्रेनेज, आपत्कालीन व्यवस्था, पथदिवे यांचा एकत्रित अभ्यास केला आहे. तीन टप्प्यात करण्यात आलेल्या अहवालात २०१५ पर्यंत शहरातील पायाभूत आणि नागरी सुविधांसाठी ५८८८, २०३२ पर्यंत २०५३.२७ आणि २०४१ पर्यंत २५७२.७८ असा एकूण १० हजार ५१४. ४२ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज अहवालात नमूद केला आहे. विकासकामांची ११ प्रकारांत विभागणी करण्यात आली होती. आयुक्त गणेश देशमुख यांनी बुधवारी उपस्थित नगरसेवकांना या शहर सुनियोजन विकास आराखड्याबद्दल माहिती दिली.

ड्रेनेज, गटारे आदीसह विविध सेवांचा दर्जा सध्या काय आहे, भविष्यात या सेवांचा दर्जा कसा असेल, या सर्व बाबींची बारकाईने माहिती शहर सुनियोजन विकास आराखड्यात नमूद करण्यात आली आहे. या आराखड्याचा उपयोग भविष्यात शहराच्या विकासासाठी होणार आहे.
- गणेश देशमुख,
आयुक्त, पनवेल महापालिका
 

Web Title: Approval of development plan in Panvel General Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल