शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
3
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
4
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
5
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
6
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
7
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
8
स्टार्टअप्समधून घडवणार १.२५ लाख नवउद्योजक! धोरण जाहीर, ५ वर्षांत ५० हजार स्टार्टअप्स सुरू करण्याचे नियोजन
9
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
10
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
11
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
12
जळगाव जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी सागर चित्रे! उपाध्यक्षपदी ॲड. स्मिता झाल्टे; विजयी उमेदवारांचा जल्लोष
13
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
14
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
15
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
16
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
17
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
18
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
19
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
20
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान

सहा वर्षांनंतर सभापतीची नियुक्ती, मुंबई बाजारसमितीवर मराठवाड्याला दुसऱ्यांदा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 01:47 IST

देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : सहा वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीवर सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली आहे. ४३ वर्षांमध्ये दहा जणांना हे पद भूषविण्याची संधी मिळाली असून, मराठवाड्याला दुसऱ्यांदा मान मिळाला आहे. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे धोरणात्मक निर्णय घेण्यास न्यायालयाने घातलेली बंदी उठणार असून, रखडलेली विकास कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.देशातील कृषी व्यापाराची सर्वाधिक उलाढाल मुंबई बाजारसमितीमध्ये होत असते. आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ व राज्यातील ३०५ बाजारसमित्यांची शिखर संस्था म्हणूनही बाजारसमितीची ओळख आहे. मुंबईमधील कृषी व्यापार स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे. शासनाने जानेवारी, १९७७ मध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीची स्थापना करून सर्व कृषी व्यापार एका छत्राखाली आणला. पा. शी देशमुख यांची पहिले सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली. एक महिन्यानंतर कि़ बा. म्हस्के यांची सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली. बाजारसमितीचे काम चांगले सुरू झाले असतानाच, मुंबईमधील वाहनांची गर्दी कमी करण्यासाठी बाजारसमिती नवी मुंबईत स्थलांतरिच करण्याचा निर्णय घेण्यात आला व टप्प्याटप्प्याने सर्व बाजारपेठा स्थलांतरित केल्या आहेत. ४३ वर्षांमध्ये तब्बल दहा जणांनी सभापतीपद भूषविले आहे. बाजारसमितीचे संचालक होण्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय राजकीय पदाधिकाºयांमध्ये चढाओढ असते. नाशिकचे देवीदास पिंगळे खासदार असताना मुंबई बाजारसमितीवर संचालक होते. पुणे जिल्ह्यातील आमदार कुमार गोसावी यांनीही सभापतीपद भूषविले आहे. जिंतूरचे यापूर्वीचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी सभापतीपद भूषविले असून, अनेक वर्षे ते बाजारसमितीवर संचालक होते. माजी मंत्री शशिकांत शिंदे हेही बाजारसमितीवर अनेक वर्षांपासून संचालक आहेत.डिसेंबर, २०१४ मध्ये शासनाने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली होती. प्रशासकीय मंडळांनी धोरणात्मक निर्णय घेऊ नये, यासाठी काही सामाजिक संघटनांनी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने प्रशासकांना धोरणात्मक निर्णय घेण्यास निर्बंध घातले होते. शासनाने वेळेत निवडणूक घेतली नसल्याने तब्बल सहा वर्षे प्रशासकीय राजवट सुरू राहिली. या काळात कांदा-बटाटा मार्केटची पुनर्बांधणी व इतर सर्व धोरणात्मक प्रकल्पांचे काम ठप्प झाले होते. बाजारसमितीच्या विकासाला गती मिळत नव्हती. सभापतीपदाचा प्रश्न सुटल्यामुळे रखडलेले प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संचालक मंडळ कसे काम करणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.असे असते संचालक मंडळ : मुंबई बाजारसमितीवर १८ लोकनियुक्त संचालक असतात. त्यांच्यामध्ये सहा महसूल विभागातून प्रत्येकी दोन असे १२ शेतकरी प्रतिनिधी. पाच व्यापारी प्रतिनिधी व एका कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो. सभापती व उपसभापतींची निवड झाल्यानंतर शासन पाच सदस्यांची नियुक्ती करते. मुंबई व नवी मुंबई महापालिकेचा प्रत्येकी एक प्रतिनिधी, पणन संचालक व बाजारसमिती सचिव असे एकूण २७ जणांचे संचालक मंडळ असते.विद्यमान संचालक पुढीलप्रमाणे : मुंबई बाजारसमितीवर सद्यस्थितीमध्ये अशोक डक(सभापती), धनंजय वाडकर (उपसभापती), बाळासाहेब सोळसकर, प्रभाकर पाटील, राजेंद्र पाटील, प्रवीण देशमुख, माधवराव जाधव, सुधीर कोठारी, हुकुमचंद आमधरे, अद्वय हिरे, जयदत्त होळकर, वैजनाथ शिंदे, शंकर पिंगळे, अशोक वाळुंज, नीलेश वीरा, विजय भुत्ता, संजय पानसरे व माथाडी नेते शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे.बाजार समितीच्या स्थापनेपासूनचे सभापतीनाव कार्यकाळपा. शि. देशमुख जानेवारी, १९७७ ते फेब्रुवारी, १९७७कि़ बा. म्हस्के फेब्रुवारी, १९७७ ते जानेवारी, १९८१व्ही. जी. शिवदारे जानेवारी, १९८१ ते फेब्रुवारी, १९८४व्ही. के. बोरावके मार्च, १९८६ ते मार्च, १९८८रामप्रसाद बोर्डीकर मार्च, १९८८ ते एप्रिल, १९९५कुमार गोसावी डिसेंबर, २००१ ते फेब्रुवारी, २००५द्वारकाप्रसाद काकाणी फेब्रुवारी, २००५ ते जानेवारी, २००८दिलीप काळे डिसेंबर, २००८ ते आॅगस्ट, २०१०बाळासाहेब सोळसकर सप्टेंबर, २०१० ते डिसेंबर, २०१४अशोक डक आॅगस्ट २०२० पासून पुढे

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई