राज साहेबांना सांग म्हणाल्याचा राग;मनसैनिकांनी टोलनाक्यावरील कामगाराला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 19:57 IST2021-02-07T19:56:35+5:302021-02-07T19:57:16+5:30

MNS sainik Beaten to Toll Naka Worker in Vashi : मराठी तरुणाने हिंदी कामगाराची बाजू घेत "राज साहेबांना सांग जा" असे वक्तव्य केल्याने मनसैनिकांनी त्याला चोप दिला. 

Anger for telling Raj Saheb; Mansainiks beat up a worker at Tolnaka | राज साहेबांना सांग म्हणाल्याचा राग;मनसैनिकांनी टोलनाक्यावरील कामगाराला मारहाण

राज साहेबांना सांग म्हणाल्याचा राग;मनसैनिकांनी टोलनाक्यावरील कामगाराला मारहाण

ठळक मुद्देकायदा हातातघेणाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी सोशल मिडियावर होत आहे. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

नवी मुंबई : वाशी टोलनाक्यावरील कामगाराला मनसेच्या कार्यालयात नेवून मारहाण करण्यात आली आहे. एका कामगाराला मराठी बोलता न आल्यामुळे कार चालकाने वाद घातला होता. यावेळी मराठी तरुणाने हिंदी कामगाराची बाजू घेत "राज साहेबांना सांग जा" असे वक्तव्य केल्याने मनसैनिकांनी त्याला चोप दिला. 

वाशी टोलनाक्यावर एका कार चालकाचा तिथल्या हिंदी भाषिक कामगारासोबत वाद झाला होता. महाराष्ट्रात राहायचे तर मराठी आलीच पाहिजे अशी तंबी कार चालकांकडून टोलनाक्यावरील हिंदी भाषिक कामगाराला दिली जात होती. यावेळी तिथल्याच एका मराठी कामगाराने त्याची बाजू घेत मराठी माणसं इथे काम करत नसल्याचे सांगितले. परंतु कार चालकाने त्याला देखील तू मराठी असून हिंदी भाषिकाची बाजू का घेतली यावरून त्याच्यासोबत वाद घातला. त्यावेळी कार चालकाने मराठीचा मुद्दा पुढे करत वाद घातला असता त्या कामगाराने "जा, राज साहेबांना सांग, जा" असे वक्तव्य केले. याचाच राग आल्याने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मराठी कामगाराला कार्यालयात आणून मारहाण केली. तसेच त्याला माफी मागायला लावून त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. टोलनाक्यावर व मनसेच्या कार्यालयात घडलेल्या दोन्ही घटनांचे व्हिडीओ मनसैनिकांकडून सोशल मीडियावर पसरवत मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण निर्मिती केली जात आहे. त्यामुळे कायदा हातातघेणाऱ्यांवर कारवाईची देखील मागणी सोशल मिडियावर होत आहे. मात्र याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

Web Title: Anger for telling Raj Saheb; Mansainiks beat up a worker at Tolnaka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.