Video : बेलगाम चालकाने वाहतूक पोलिसास नेले फरपटत, घटना कॅमेरात कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 09:58 IST2022-07-10T09:57:54+5:302022-07-10T09:58:55+5:30

महिला डॉक्टरच्या सतर्कतेने वाचला जीव.

An driver wanders around the traffic police video goes viral social media new panvel doc saved his life | Video : बेलगाम चालकाने वाहतूक पोलिसास नेले फरपटत, घटना कॅमेरात कैद 

Video : बेलगाम चालकाने वाहतूक पोलिसास नेले फरपटत, घटना कॅमेरात कैद 

नवीन पनवेल : कोपरा ब्रिज येथे कारवाई दरम्यान वाहतूक पाेलीस शिपाई नामदेव गादेकर यांना एका  बेलगाम कारचालकाने बोनेटवरून खारघरच्या स्वर्णागंगा ज्वेलरी शॉपपर्यंत विरुद्ध दिशेने फरपटत नेल्याचा  जीवघेणा प्रकार शनिवारी घडला. यावेळी पनवेलमधील लाइफलाइन हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टर जानवी पाटील यांच्या सतर्कतेमुळे वाहतूक पोलिसाचा जीव वाचला.

पोलीस शिपाई गादेकर हे कारवाई करीत असताना कारला अडवण्याचा  प्रयत्न केला असता चालकाने ती त्यांच्या अंगावर घालून बोनेटवर त्यांना फरपटत नेले. हा गंभीर प्रकार  त्यावेळी  प्रवास करणाऱ्या जानवी पाटील यांच्या निदर्शनास आला. त्यांनी मोबाइलने शूटिंग करून तसेच त्याची गाडी थांबविली.

 
यावेळी पाठीमागून धावत येणारे पोलीस नाईक निवृत्ती भोईर यांनी त्या चालकाला ताब्यात घेऊन त्याला खारघर पोलिसांच्या हवाली केले. गादेकर यांचा जीव वाचविल्याबद्दल पोलिसांनी डॉ. पाटील यांचे कौतुक करून मानवता दृष्टिकोन ठेवल्याबद्दल आभार मानले.

Web Title: An driver wanders around the traffic police video goes viral social media new panvel doc saved his life