जबरदस्त कामगिरी! १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी परत मिळवून दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 21:39 IST2025-03-23T21:35:51+5:302025-03-23T21:39:30+5:30
कोपखैरणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने पर मिळवून दिले आहे.

जबरदस्त कामगिरी! १० वर्षांपूर्वी चोरीला गेलेले दागिने पोलिसांनी परत मिळवून दिले
कोपखैरणे पोलिसांनी एक मोठी कामगिरी केली आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने पर मिळवून दिले आहे. दहा वर्षापूर्वी चोरीला गेलेले सोने परत मिळाल्यामुळे सोने मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. आत्ताच्या महागाईच्या काळात दहा वर्षांपूर्वी हरवलेले सोने, चांदीचे दागिने परत मिळाल्यावर मूळ मालकाचा आनंद गगनात मावेनासा झाला.
मध्यप्रदेशात भीषण अपघात! महाराष्ट्रातील दोन महिला डॉक्टरांचा मृत्यू, कार पलटली
कोपरखैरणे पोलिसांनी आपल्या हद्दीतून हरवलेले तसेच चोरीला गेलेले तब्बल ३० लाखांचे दागिने शोधून मूळ मालकांना परत केले आहेत. कोपरखैरणे परिसरातील गेल्या दहा वर्षापासून हरवलेले तसेच चोरीला गेलेल्या ९ तक्रारदारांना त्यांचे दागिने पोलिसांनी परत केले आहेत. इतक्या वर्षांनंतर आपले दागिने परत मिळाले यावर विश्वास बसत नाही.
पोलिसांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत, असे मूळ मालकाने आनंद व्यक्त करताना सांगितले. कोपरखैरणे पोलिसांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.
पत्नीवर संशय घेत ३ वर्षाच्या चिमुरड्याचा बापाने गळा चिरला
शहरात एका इंजिनिअर पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत ३ वर्षाच्या लहान मुलाचा गळा चिरून मृतदेह जंगलात फेकला आहे. पुण्यातील चंदन नगर भागात ही खळबळजनक घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी एका लॉजमध्ये नशेच्या अवस्थेत सापडला. मृत हिंमत माधव टिकेती हा इंजिनिअर माधव टिकेती आणि त्याची पत्नी स्वरूपा याचा एकुलता एक मुलगा होता. हे कुटुंब मूळचं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टनम येथे राहणारे आहे.