शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

युती, आघाडी होण्याची शक्यता धूसर

By admin | Updated: January 8, 2015 22:40 IST

प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत.

वसई : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आरक्षणानुसार उमेदवार शोधणे तसेच मित्रपक्षाशी जागावाटपासंदर्भात चर्चाविनिमय करण्याच्या तयारीला लागले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर युती व आघाडीमध्ये बेबनाव निर्माण झाल्यामुळे त्या निवडणुकांमध्ये सेना-भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. कालांतराने सेना-भाजपाची युती झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या दोघांमध्ये जागांसंदर्भात समझोता होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप सुंदोपसुंदी सुरूच असल्यामुळे हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात एकमेकांसमोर उमेदवार उभे करतील, असा अंदाज आहे.पालघर जिल्ह्यातील ३ विधानसभा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीने वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीमध्ये सातही तालुक्यांतील गट व गणांच्या जागा लढवण्यासाठी त्यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. सरकार स्थापनेकरिता भाजपाला बिनशर्त पाठिंबा देणारी बविआ जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुकांमध्ये भाजपाशी समझोता करील, अशी शक्यता नाही. स्थानिक पातळीवर भाजपा पदाधिकाऱ्यांशी बविआच्या वरिष्ठ नेत्यांचे तेवढे सलोख्याचे संबंध नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर समझोता होण्याची शक्यता फार कमी आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाशी दुरावा निर्माण झाल्यामुळे बविआ पुन्हा काँगे्रसच्या वळचणीला जाणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. डहाणूवगळता अन्य तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे बळ नसल्यामुळे या निवडणुका लढवताना राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. सेनेने यापूर्वीही पालघर तालुक्यात या निवडणुकांमध्ये वर्चस्व मिळविल्याने यंदाही ते पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. पालघर येथे सेनेची लढत बहुजन विकास आघाडीशीच होण्याची शक्यता आहे. माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर येथील काँगे्रस विस्कळीत झाली आहे. दीड महिन्यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रचंड वाद झाले. एकंदरीत या सर्व घडामोडीवरून काँग्रेस पक्ष एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाईल, अशी शक्यता वाटत नाही. वसई जनआंदोलन समितीचे नेते विवेक पंडित यांचा प्रचंड मतांनी पराभव झाल्यामुळे हा पक्ष अद्याप पराभूत मानसिकतेमधून बाहेर आलेला नाही. त्यामुळे त्यांनाही या निवडणुका लढवणे अत्यंत जिकिरीचे ठरणार आहे.