शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघातप्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या बाळाची बालसुधारगृहात रवानगी
2
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
3
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
4
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
5
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
6
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
7
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
8
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
9
अनुप्रिया पटेल, रामदास आठवलेंच्या राज भैयांवरील वक्तव्यांनी यूपीमध्ये भाजपाचं गणित बिघडवलं, होणार मोठं नुकसान? 
10
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
11
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
12
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
13
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
14
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
15
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
16
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
17
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
18
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
19
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
20
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण

भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी, सोनारीत २४ फेब्रुवारीला निवडणूक  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 3:38 AM

उरण तालुक्यातील सोनारी ग्रा.पं.मध्ये भाजपाविरोधात शिवसेना, शेकाप, मनसे आदी सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होणार आहे.

उरण : तालुक्यातील सोनारी ग्रा.पं.मध्ये भाजपाविरोधात शिवसेना, शेकाप, मनसे आदी सर्वपक्षीय आघाडी अशी लढत होणार आहे. बुधवारी भाजपाच्या तर गुरुवारी आघाडीच्या उमेदवारांनी शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशा सरळ लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे.तालुक्यातील सोनारी ग्रामपंचायतीत नऊ सदस्य संख्या आणि थेट सरपंच अशा दहा जागांसाठी ही निवडणूक २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपाविरोधात सर्वपक्षीय आघाडी अशी थेट लढत होत आहे.सर्वपक्षीय आघाडीतून सरपंचपदासाठी शिवसेनेच्या सुजाता कडू यांनी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाकडून पूनम कडू यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाप्रमुख रवि भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक कौशिक शहा, सोनारीचे माजी सरपंच महेश कडू आदी उपस्थित होते.भाजपाच्या ग्रा.पं.च्या नऊ जागांसाठी सेना चार, शेकाप तीन आणि मनसे दोन अशा नऊ जागांची विभागणी करण्यात आल्याची माहिती सोनारी शाखाप्रमुख नारायण तांडेल यांनी दिली.गुरुवारी भाजपाविरोधात आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या वेळी तालुकाप्रमुख संतोष घरत, जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे, घारापुरी सरपंच बाळाराम ठाकूर, सोनारी माजी सरपंच रोहिदास पाटील, शाखाप्रमुख नारायण तांडेल, शेकापचे तालुका चिटणीस मेघनाथ तांडेल, उरण पं. स. उपसभापती वैशाली पाटील, नाहिदा ठाकूर, मनसेचे अजय तांडेल, सुनील भोईर, शहरप्रमुख जयंत गांगण आणि आघाडीचे सर्व शिवसैनिक उपस्थित होते. सेनेचा एक गट भाजपाच्या गटात सामील झाला आहे, त्यामुळे भाजपाकडून सेना सोबत असल्याचा अपप्रचार केला जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारण