शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक, चौघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:20 IST

जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे.

नवी मुंबई : शासनाच्या परवानग्या न घेता, आठ कंपन्या स्थापन करून गुंतवणूकदारांना फसविणाऱ्या टोळीतील चौघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे.जादा व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी मेहुल गिरीष भानुशाली, कुणाल विनायक बाविस्कर, गणेश मोहन मस्तुद व अरविंद साहेबराव काशीद यांचा समावेश आहे. या चौघांनी ग्लोबल ड्रेडिंग, बी.एस. वाय. मार्केटिंग, बिलिव्ह युवर सेल मल्टिट्रेड, रॉयल पे, पीजीएमईन, माय डीएस बी असोसिएट्स, एस. एम. वर्ल्ड, ग्रोथ इंडिया या कंपन्या सुरू केल्या होत्या. या कंपन्यांच्या माध्यमातून प्रतिदिन दोन टक्के दराने १०० दिवस परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवी स्वीकारण्यास सुरुवात केली होती. वाशी सेक्टर १९ मधील सारंग हेरिटेज लॉज, अ‍ॅम्बियन्स कोर्ट येथे कंपनीचे काही जण पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या चौघांनी व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही परवानग्या घेतल्या नव्हत्या. वाशीमधील एक महिलेने या कंपन्यांमध्ये पाच लाख ९० हजार रुपये गुंतविले होते; परंतु प्रत्यक्षात व्याजाची रक्कम दिलेली नाही. इतरांनाही अशाच प्रकारे आमिष दाखविले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांच्याविरोधात एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा तपासात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर देसाई, अतुल लांबे, संदीप सहाणे, संतोष शेटे, सदानंद सोनकांबळे, राजेश सलगर, ताराचंद पाटील, सचिन पाटील,संदीप चव्हाण यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असून, पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी