शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अडवली भुतावलीमधील डेब्रिजचे पडसाद विधानसभेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 02:55 IST

अडवली भुतावलीमध्ये शेकडो एकर जमिनीवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या प्रश्नाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार मंदा म्हात्रे यांनी आदिवासींसह शेतक-यांवर अन्याय करणा-या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

नवी मुंबई : अडवली भुतावलीमध्ये शेकडो एकर जमिनीवर टाकण्यात आलेल्या डेब्रिजच्या प्रश्नाचे पडसाद विधानसभेमध्ये उमटले. आमदार मंदा म्हात्रे यांनी आदिवासींसह शेतक-यांवर अन्याय करणा-या माफियांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. माफियाराज संपविण्यात यावे अशी भूमिका मांडली आहे.नवी मुंबईमधील अडवली भुतावली परिसरामधील ३५५ हेक्टर वनजमीन व ९५ एकर खाजगी जमिनीवर निसर्ग उद्यान उभारण्यात येणार होते. परंतु मागील काही वर्षांपासून येथील वनजमिनीला लागून असलेल्या खाजगी जमिनीवर डेब्रिज माफियांनी भराव करण्यास सुरवात केली आहे. सातत्याने चार ते पाच वर्षे रोज शेकडो डंपरमधून डेब्रिज खाली करण्यात आले आहे. ६० ते ७० फूट उंचीची डेब्रिजची टेकडी तयार झाली आहे. माफियांनी बोनकोडेमध्ये वास्तव्य करत असलेल्या आनंद नाईक व इतर शेतकºयांच्या जमिनीवर अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. त्यांच्या जमिनीच्या चारही बाजूने डेब्रिजची टेकडी तयार केली आहे. शेताकडे जाण्यास मार्गच ठेवलेला नाही. शेतकरी अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांचा विरोध डावलण्यासाठी डंपर अंगावर घालून खून करण्याचा प्रयत्नही करण्यात आला होता. महापालिकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही घटनास्थळी जावून डेब्रिज माफियांवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. परंतु प्रशासनाकडून नोटीस देण्याव्यतिरिक्त कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. माफियांनी डेब्रिज टाकल्यामुळे येथील नैसर्गिक नालाही बुजला असून अनेक झाडांची कत्तल करण्यात आली आहे. महापालिका, पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी काहीच कारवाई करत नसल्याने शेतकºयांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.शेतकºयांना व आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी याविषयी अडवली भुतावली मधील डेब्रिजच्या विषयावर विधानसभेमध्ये आवाज उठविला आहे. या परिसरातील वनविभागाच्या जागेवरील जंगल नष्ट करण्याचा डाव असून तेथे टाऊनशीप उभारण्याचे षड्यंत्र सुरू आहे. तेथील शेतकºयांनी जमीन विकण्यास विरोध केल्याने त्यांच्या शेताभोवती डेब्रिज टाकले आहे. महापालिका व प्रशासनाकडे तक्रारी करूनही काहीही कारवाई केली नसल्याबद्दल म्हात्रे यांनी विधानसभेमध्ये नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी माफियांवर कारवाई करून शेतकºयांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही भूमिका त्यांनी यावेळी मांडली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अडवली भुतावली परिसरामध्ये वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण झालेले नाही पण खाजगी जमिनीवर डेब्रिज टाकल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी डेब्रिज टाकण्यास महापालिकेने मनाई आदेश जारी केला आहे.घटनास्थळाची पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.