शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर कचरा टाकल्यास होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 01:41 IST

नवी मुंबई महापालिकेचे संकेत

नवी मुंबई : उघड्यावर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई महापालिकेने दिले आहेत. नवी मुंबई महापालिका गेल्या काही वर्षांपासून कचराकुंडीमुक्त शहर करण्यासाठी विशेष मोहीम राबवीत आहे. त्याअनुषंगाने शहरातील कचराकुंड्यांची संख्या हळूहळू कमी केली जात आहे. नेरूळ आणि बेलापूर विभागात कचराकुंडी हटविलेल्या ठिकाणी बॅनर लावून उघड्यावर कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. परंतु संबंधित नियमांचे उल्लंघन केले जात असून कचराकुंडी हटविलेल्या ठिकाणी, पदपथ आणि रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केले होते. महापालिकेने या वृत्ताची दखल घेतली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात स्वच्छता राखण्याचे तसेच उघड्यावर कचरा न टाकण्याचे आवाहन नवी मुंबई महापालिकेने केले आहे. 

शहरात स्वच्छता राखणे जेवढी महापालिकेची जबाबदारी आहे तेवढीच जबाबदारी शहरातील प्रत्येक नागरिकाचीही आहे. शहराचे सौंदर्य आणि आपले आरोग्य यासाठी स्वच्छता महत्त्वाची असून उघड्यावर कचरा टाकणे योग्य नाही. कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाणार असून कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. - राजेंद्र सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी, न.मुं.म.पा.

गस्त घालण्याचा निर्णयज्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकला जातो अशा ठिकाणी गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी कचरा टाकताना नागरिक आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत नवी मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई