अतिक्रमण विरोधी कारवाईत नवी मुंबईत दगडफेक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2018 03:12 PM2018-06-05T15:12:42+5:302018-06-05T15:12:42+5:30

कोपरखैरणे येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना दगडफेक झाल्याची घटना घडली आहे

In the action against encroachment, stone pelting in Navi Mumbai, and senior police inspector injured | अतिक्रमण विरोधी कारवाईत नवी मुंबईत दगडफेक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जखमी

अतिक्रमण विरोधी कारवाईत नवी मुंबईत दगडफेक, वरिष्ठ पोलिस निरीक्षक जखमी

Next

नवी मुंबई - कोपरखैरणे येथे अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी आवटे जखमी झाले आहेत. महावीर हॉस्पिटलमध्ये शिवाजी आवटे यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

कोपरखैरणेतील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी कारवाई टाळण्यासाठी तुफान दगडफेक केली.  बालाजी मूव्ही थेटरच्या काचांची तसेच रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोड़फोड़ करण्यात आली.  या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. 

घटनास्थळी शीघ्र कृती दलाचे पथक मागवण्यात आले आहे. जमाव पांगवण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. रस्त्याच्या एका बाजूला पोलिस तर दुसऱ्या बाजूला हातात दगड घेवून जमाव उभा आहे.  

Web Title: In the action against encroachment, stone pelting in Navi Mumbai, and senior police inspector injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.