शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाच्या ३४२ बसवर कारवाई, नाशिकमधील अपघातानंतर मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 00:12 IST

नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला.

- वैभव गायकरपनवेल : एसटी महामंडळाच्या बसचालकांवर वारंवार बेशिस्तपणाने वाहन चालविण्याचे आरोप होत असतात. मात्र, सरकारी कर्मचारी असल्याने अनेकदा या वाहनचालकांना कारवाईतून झुकते माप दिले जाते. मात्र, मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर २३ ते ३० जानेवारी दरम्यान राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतुकीचे नियम पायदळी तुडविणाऱ्या ३४२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.नाशिकमध्ये धोबीघाट परिसरात काही दिवसांपूर्वी झालेल्या एसटी महामंडळाची बस व रिक्षाच्या अपघातात सुमारे २५ जणांना जीव गमवावा लागला. तर ३५ पेक्षा जास्त प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या अतिवेगामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर द्रुतगती महामार्ग पोलिसांनी मोहीम अधिक तीव्र केली आहे. महामार्ग अधीक्षक विजय पाटील, पोलीस अधीक्षक ठाणे परिक्षेत्रचे डॉ. दिगंबर प्रधान, एसटी महामंडळाचे वाहतूक अधिकारी धनाजी घाटगे, अरुण विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस्पे केंद्राच्या मार्फत दोन्ही मार्गिकेवर ही कारवाई करण्यात आली. सरकारी यंत्रणेवरील वाहन असल्याने एसटी महामंडळाचे चालक सर्रास वाहतूक नियमांना बगल देत वाहतुकीचे नियम यायदळी तुडवत असतात, त्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागतो.कारवाईमध्ये एसटी महामंडळाच्या शिवनेरी, शिवशाही, विठाई, हिरकणी आदीसह इतर राज्य महामंडळाच्या बसचा समावेश आहे.वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या कारणावरून एसटी महामंडळाच्या वाहनचालकांवर ई-चलन मशिनद्वारे कारवाई करण्यात आली. कारवाईच्या वेळी पोलीस निरीक्षक सुदाम पातोरडकर, सहायक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, महाराष्ट्र राज्य दिनेश कदम, विनायक यादव, डी. पी. आंडील, मुंबई विभागाचे सहायक वाहतूक निरीक्षक पी. जी. माने उपस्थित होते.एसटी महामंडळाकडून गंभीर दखलकारवाई संदर्भात एसटी महामंडळस्तरावर गंभीर दखल घेण्यात आली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपव्यवस्थापक संजय सुपेकर यांनी दिली.दंडाची रक्कम चालकांच्या वेतनातून वसुली?एसटी महामंडळाच्या ३४२ वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असल्याने, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. हा दंड संबंधित चालकांच्या वेतनातून वसूल केला जाण्याची शक्यता आहे.एसटी बसद्वारे मोठ्या प्रमाणात प्रवासीवाहतूक होत असते. अतिवेगाने वाहन चालविणे, नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांच्या जीवास धोका निर्माण होतो. याबाबत वेळोवेळी जनजागृती करण्यात येते. तरीही नियमांचे उल्लंघन होत असल्याने विशेष मोहीम राबवून कारवाई करण्यात आली.- सुभाष पुजारी, सहायक पोलीस निरीक्षक, पळस्पे केंद्र द्रुतगती महामार्ग

टॅग्स :state transportएसटी