लोकलच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला लागला शॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 08:24 IST2025-08-12T08:24:45+5:302025-08-12T08:24:45+5:30
वाशी रेल्वे स्थानकात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

लोकलच्या टपावर बसून प्रवास करणाऱ्या तरुणाला लागला शॉक
नवी मुंबई : रेल्वेच्या टपावर बसून प्रवास तरुणाला करणाऱ्या तरुणाला पेंटाग्राफचा शॉक लागल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. वडाळा येथून पनवेलला जाणाऱ्या लोकलवर हा अपघात झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे वाशी लोहमार्ग पोलिसांनी सांगितले.
वाशी रेल्वे स्थानकात सोमवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अंकुर पांडे (३०) हा रेल्वेच्या टपावर बसून प्रवास करत होता. दरम्यान, पेंट्राग्राफला स्पर्श झाल्याने शॉक लागून तो गंभीर जखमी अवस्थेत टपावर पडला होता. लोकल वाशी स्थानकात आल्यानंतर त्याला खाली उतरवून रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडाळा ते वाशीदरम्यान तो नेमका कधी रेल्वेवर चढला हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, तो आत्महत्येच्या उद्देशाने टपावर चढला असावा, अशी शक्यता वाशी रेल्वे पोलिसांनी व्यक्त केली आहे. जखमी तरुणाची प्रकृती नाजूक असून, त्याच्या नातेवाइकांचा शोध सुरू असल्याचे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले.