शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या पहिल्या आठवड्यात मनपाची ७७.९२ कोटी करवसुली

By admin | Updated: July 8, 2017 06:01 IST

‘एक देश, एक कर’ ही संकल्पना संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून लागू झाली आहे. जीएसटीच्या

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना संपूर्ण देशभरात वस्तू व सेवा कर अर्थात जीएसटीच्या माध्यमातून लागू झाली आहे. जीएसटीच्या अनुदानाच्या पहिल्या हप्त्यात नवी मुंबई महानगरपालिकेने ७७.९२ कोटी करवसुली केली असून, राज्यात चौथ्या क्रमांकाची रक्कम मिळाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकरिता विशेष प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणातंर्गत कर प्रणाली पूर्णत: समजून घ्यावी व देयके बनविताना आणि तपासताना ती अचूक असावीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना करण्यात आल्या. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी आपल्या महानगरपालिकेच्या करवसुली विभागाने मागील तीन वर्षे अतिशय चांगले काम केल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. करवसुलीचा हाच वेग कायम ठेवत या वर्षातही चालू वसुली, तसेच मागील थकबाकीची वसुली अधिक कशी होईल, यावर भर देण्याच्या सूचना या वेळी करण्यात आल्या. दोन सत्रांत आयोजित केलेल्या या विशेष प्रशिक्षण वर्गातील जीएसटी कर प्रणालीबाबतच्या माहितीचा उपयोग सर्व अधिकारी-कर्मचारी यांना यापुढील काळात लेखाविषयक कामकाजात होईल, असा विश्वास व्यक्त करीत मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी प्रास्ताविकपर मनोगतात जीएसटी करप्रणालीबाबत कोणत्याही प्रकारची शंका मनात राहू नये, यादृष्टीने माहितीच्या सत्रानंतर चर्चासत्रामध्ये शंकानिरसन करण्यात आले. या वेळी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण, प्रशासन विभागाचे उपआयुक्त डॉ. सुहास शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त किरणराज यादव, प्रशिक्षणाचे मार्गदर्शक वक्ते जिग्नेश चावला व ऋ तुराज इंगळे आणि इतर विभागप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.