शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा शॉक लागून ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तुर्भे इंदिरा नगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 18:18 IST

याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देतन्मय चव्हाण (७) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तो घरासमोर खेळत होता.परिसरात उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरी सुरक्षित करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नवी मुंबई - विजेचा शॉक लागून सात वर्षीय मुलाच्या मृत्यूची घटना तुर्भे इंदिरानगर येथे घडली आहे. उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरीमुळे लोखंडी शिडीच्या विद्युत प्रवाह उतरल्याने हि घटना घडली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.तन्मय चव्हाण (७) असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तो घरासमोर खेळत होता. यावेळी समोरच्या घराच्या लोखंडी शिडीला त्याचा स्पर्श झाला असता, शॉक लागून त्याचा मृत्यू झाला. सदर घराला वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वायरी शिडीपासून काही अंतरावरच लटकलेल्या आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या वायरींमधून लोखंडी शिडीत विद्युत प्रवाह उतरल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच तुर्भे एमआयडीसी पोलीस व महावितरच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी पोलिसठाण्यात घटनेची नोंद देखील करण्यात आली आहे. त्यानुसार दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मयत तन्मयच्या कुटुंबीयांनी केली आहे. तर इंदिरानगर परिसरात प्रतिवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असून त्यामध्ये अनेकजण मृत पावत असल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते महेश कोठीवाले यांनी केला आहे. मात्र, परिसरात उघड्यावर लटकणाऱ्या विद्युत वायरी सुरक्षित करण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान शुक्रवारी घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल

 

गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा

 

अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार

 

...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'

 

मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला

 

पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर

 

टॅग्स :Deathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबईelectricityवीज