शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये ५० इमारती धोकादायक

By admin | Updated: September 3, 2015 03:03 IST

नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत.

पनवेल : नगरपालिकेच्या हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या पन्नासच्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काही ठिकाणी मालक व भाडोत्रींमध्ये वाद आहे. त्यामुळे लोक जीव धोक्यात घालून रहात असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.पनवेलमधील जुन्या वाड्यांची जागा इमारतींनी घेतली असली तर आजही काही जुनी बांधकामे शहरात आहेत. काही इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या असून त्यांची समजूतही घालण्यात आली आहे. मात्र मालक आणि भाडोत्री यांच्यातील वाद या गोष्टीचा अडथळा निर्माण करीत आहे. काही महिन्यांपूर्वी मिरची गल्ली येथे मोडकळी आलेली इमारत अचानक कोसळली. सुदैवाने घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र पुरोहित यांच्या मालकीच्या या इमारतीत भाडोत्री कोणत्याही परिस्थिती घर खाली करायला तयार नाही. अशीच परिस्थिती इतर ठिकाणी सुध्दा असल्याने आजच्या घडीला काही धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या नाहीत.महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनांतर्गत पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारती त्याचबरोबर त्यांच्या मालकांची नावे प्रसिध्द करून जाहीरपणे इमारती खाली करून ते बांधकाम निष्कासित करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर जाहिरात फलकावर बॅनर्स लावून नागरिकांना या संदर्भात धोक्याची सूचना दिली. पनवेल बस स्थानकाच्या एका इमारतीचाही त्यामध्ये समावेश होता. पालिकेची नोटीस मिळताच एसटी महामंडळाने दोनही बसस्थानक दुसऱ्या ठिकाणी हलविले आणि संबंधित इमारत जमीनदोस्त केली. त्याच यादीत आयटीआयच्या इमारतीचा सुध्दा समावेश होता मात्र ही इमारत जैसे थे आहे. या ठिकाणी विद्यार्थी जीव मुठीत धरून राहत आहेत. (वार्ताहर)