पनवेल तालुक्यातील ४३ गावे हागणदारीमुक्त

By admin | Published: March 28, 2017 06:14 AM2017-03-28T06:14:08+5:302017-03-28T06:14:08+5:30

‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यात हागणदारीमुक्तीचा नारा आतापर्यंत ४३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचला आहे.

43 villages of Panvel taluka are free from hawkers | पनवेल तालुक्यातील ४३ गावे हागणदारीमुक्त

पनवेल तालुक्यातील ४३ गावे हागणदारीमुक्त

Next

मयूर तांबडे / पनवेल
‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमांतर्गत पनवेल तालुक्यात हागणदारीमुक्तीचा नारा आतापर्यंत ४३ ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचला आहे. तालुक्यातील ६९ ग्रामपंचायतींपैकी ४३ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. उर्वरित २६ ग्रामपंचायती १०० टक्के हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट प्रशासनासमोर आहे. यासाठी आता प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. ४३ ग्रामपंचायती शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
उर्वरित गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर आराखडा तयार करण्यात आला असून काम प्रगतिपथावर आहे. संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. ३१ मार्चपर्यंत तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु आहेत. यासाठी अधिकाऱ्यांनी गावोगाव पिंजून काढले आहेत. शौचालयाबाबत व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. गावात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामसेवकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्याला १२ हजार रु पयांचे अनुदान देण्याची सोय केली आहे. तालुक्यातील अन्य गावांचा पंचायत समितीमार्फत सर्व्हे करण्यात आला आहे.
त्यानुसार इतर गावे देखील लवकरच हागणदारीमुक्त होणार आहेत. या कुटुंबांनीही शौचालय बांधावेत यासाठी पंचायत समितीकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

तालुक्यातील ४३ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झालेल्या आहेत. उर्वरित २७ ग्रामपंचायती ९० टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. लवकरच संपूर्ण पनवेल तालुका हागणदारीमुक्त होईल.
- धोंडू तेटगुरे,
गटविकास अधिकारी,
पनवेल पंचायत समिती


हागणदारीमुक्त झालेल्या ग्रामपंचायती
सावळे, आकुर्ली, चिखले, खैरणे, वहाळ, कोळखे, आदई, पालीदेवद, विचुंबे, केवाळे, चिंध्रण, खानाव, वलप, गिरवले, दापोली, पळस्पे, देवलोळी, चिपळे, कराडे खुर्द, उसर्ली, नेरे, नितलस, शिवकर, जांभिवली, कोन, उमरोली, दिघाटी, हरिग्राम, पाले बुद्रुक, वाकडी, बारवई , भातान, न्हावे, नानोशी, खानावले, सोमटणे, कसलखंड, कुंडेवहाळ, कर्नाळा, मोरबे, कानपोली, करंजाडे, सांगुर्ली.

Web Title: 43 villages of Panvel taluka are free from hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.