सिडकोच्या घरांसाठी विनाकागदत्रे मिळणार ३० लाखांचे कर्ज; यशस्वी अर्जदारांसाठी सिडकोचा पुढाकार

By कमलाकर कांबळे | Published: November 17, 2022 05:10 PM2022-11-17T17:10:15+5:302022-11-17T17:11:01+5:30

आर्थिक दुर्बल घटकांसाठी बॅंकांचा मदतीचा हात

30 lakh loan for CIDCO houses without documents; CIDCO's initiative for successful applicants | सिडकोच्या घरांसाठी विनाकागदत्रे मिळणार ३० लाखांचे कर्ज; यशस्वी अर्जदारांसाठी सिडकोचा पुढाकार

सिडकोच्या घरांसाठी विनाकागदत्रे मिळणार ३० लाखांचे कर्ज; यशस्वी अर्जदारांसाठी सिडकोचा पुढाकार

googlenewsNext

नवी मुंबई: सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सिडकोच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात घरे बांधली जात आहेत. परंतु, उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे या घटकांतील अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बॅंक तयार होत नाही. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने अशा घटकांसाठी सकारात्मक पावले उचलली आहेत. त्यानुसार सिडकोच्या गृहप्रकल्पात यशस्वी ठरलेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील अर्जदाराला कागदपत्रांविना ३० लाख रुपयांचे गृहकर्ज देण्यास काही राष्ट्रीयकृत बॅंकांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील यशस्वी अर्जदारांची गृहकर्जासाठी होणारी परवड थांबेल, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने उलवे नोडमधील खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या ७८४९ घरांची योजना जाहीर केली आहे. यातील घरांचे क्षेत्रफळ ३१० चौरस मीटर इतके असून त्यांची किमत ३२ ते ३५ लाखांच्या दरम्यान आहे. यात आर्थिक दृष्ट्या दुर्बल (इडब्लूएस), अल्प उत्पन्न घटक आणि खुल्या वर्गासाठी घरे उपलब्ध आहेत.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २७४७ घरे असून त्यांची उत्पन्न मर्यादा वार्षिक तीन लाख रुपये इतकी आहे. तर एलआयजी अर्थात अल्प उत्पन्न घटकांसाठी वार्षिक सहा लाख रुपयांच्या उत्पन्न मर्यादा आहेत. एलआयजी प्रवर्गातील अर्जदारांना कोणतीही बॅंक किंवा वित्तसंस्थेतून सहज गृहकर्ज मिळू शकतो. मात्र, वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या ईडब्लूएस अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील घटकांना कर्ज मिळणे अवघड असते. हीच बाब लक्षात घेऊन सिडकोने काही बॅंकांशी चर्चा केली आहे.

या बँका देणार कर्ज

या गृहप्रकल्पातील सोडत प्रक्रियेत यशस्वी ठरणाऱ्या ईडब्लूएस प्रवर्गातील अर्जदांना सक्षम कागदपत्रांअभावी अगदी कमी व्याज दरात ३० लाख रुपयांचे गृहकर्ज देण्याची तयारी आयएलएफसी या वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थेने दर्शविली आहे. त्याच प्रमाणे एसबीआय या राष्ट्रीयकृत बॅंकेने या प्रवर्गातील यशस्वी अर्जदारांना २५ लाखांचे गृहकर्ज देण्यास सहमती दर्शविली आहे. तर पीएनबी आणि टीजेएसबी या दोन बॅंकांबरोबर वाटाघाटी सुरू असल्याचे सिडकोच्या संबधित विभागाने स्पष्ट केले आहे.

१० ते १२ लाखांनी घरे स्वस्त

या घरांच्या किमती ३२ ते ३५ लाखांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे खासगी विकासकांपेक्षा ही घरे महाग असल्याची चर्चा रियल इस्टेट मार्केटमध्ये सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र प्रशस्त कॉम्प्लेक्स, दर्जेदार सुविधा, उच्च दर्जाचे बांधकाम, उत्तम कनेक्टिव्हिटी आदीमुळे ही घरे तुलनात्मकदृष्ट्या १० ते १२ लाखांनी स्वस्त असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

Web Title: 30 lakh loan for CIDCO houses without documents; CIDCO's initiative for successful applicants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.