शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण रायगडमधील नगरपंचायतींना ३ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 02:22 IST

नवीन नगरपंचायत साहाय्य योजनेचा माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळाला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कमाणगाव :  दक्षिण रायगड जिल्ह्यातील नगरपंचायती आणि नगरपालिकांसाठी गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये निधी मिळविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेला पाठपुरावा यशस्वी झाला आहे. नवीन नगरपंचायत सहाय्य योजनेतून नगरपंचायत माणगांव, म्हसळा, श्रीवर्धन, तळा यांना खात्यामध्ये ३ कोटी रूपयांचा निधी जमा झाल्याची माहिती यावेळी मुख्याधिकारी विराज लबडे यांनी दिली आहे. महाड, माणगांव विधानसभा मतदार संघाचे आ.भरत गोगावले यांच्या प्रयत्नांतून हे शक्य झाले आहे.रायगड जिल्ह्यातील महाड, रोहा, मुरूड, अलिबाग, खोपोली, माथेरान, श्रीवर्धन, कर्जत, पेण, उरण या नगरपालिका आणि पाच वर्षांपूर्वी नव्याने निर्माण झालेल्या म्हसळा, माणगांव, पोलादपूर, तळा या नगरपंचायतींसाठी अनुदानाची मागणी महाड, माणगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांनी गेल्या ऑगस्ट २०२० मध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार माणगांव १ कोटी २५ लाख, म्हसळा ४५ लाख, श्रीवर्धन १ कोटी २० लाख, तळा १ कोटी या नगर पंचायतीना मंजूर करण्यात आले आहेत.

आगामी दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणगांव नगरपंचायत हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर म्हसळा, श्रीवर्धन, तळा नगरपंचायतींना नगरविकास मंत्रालयाकडून निधी उपलब्ध झाल्याने आ.गोगावले यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे. यावेळी आ.गोगावले यांच्यासोबत अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आ. महेंद्र दळवी यांनी देखील अलिबाग नगरपालिकेसाठी निधी उपलब्ध केल्याबद्दल एकनाथ शिंदे यांना धन्यवाद दिले आहेत. एकनाथ शिंदे यांनी यावेळी आ.गोगावले आणि आ.दळवी यांना नगरविकास मंत्रालयाने संबंधित नगरपंचायती व नगरपालिका यांच्या खात्यात विकास निधी जमा केल्याचे पत्र सुपूर्द केले. हे पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल नगवणे यांनी त्या त्या नगर पंचायतींना शिवसेना पदाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आले आहे. 

n यावेळी शिवसेना नेते ॲड. राजीव साबळे, इंदापूर सरपंच नगवणे, माणगांव शाखाप्रमुख अजित तार्लेकर, गटनेते सचिन बोंबले, नगरसेवक नितीन बामुगडे, सेना युवा पदाधिकारी सुनील पवार, पत्रकार अरुण पवार, राजेंद्र नवगणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई