शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

महापालिकेच्या उत्पन्नात २५ वर्षांत १९४ पटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 03:18 IST

पालिकेची आर्थिक स्थिती मजबूत, अडीच दशकात २४८१० कोटी जमा

नामदेव मोरे

नवी मुंबई : महापालिकेचा पहिला अर्थसंकल्प १९९५-९६ मध्ये सादर करण्यात आला. सुरुवातीला ७९ कोटी ३४ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला; परंतु प्रत्यक्षात फक्त १८ कोटी ५८ लाख रुपयेच वसूल झाले. अंदाजापेक्षा तब्बल ६० कोटी ७६ लाख रुपये कमी वसुली झाली. पुढील २५ वर्षांमध्ये अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींचे नियोजन व परिश्रमामुळे उत्पन्नामध्ये तब्बल १९४ पटीने वाढ करण्यात यश आले आहे. रौप्य महोत्सवी वाटचालीमध्ये २४८१० कोटी रुपये उत्पन्न मिळविले असून, पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आहे.

ग्रामपंचायतीमधून थेट महापालिकेत रूपांतर झालेली नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका. स्वच्छ भारत अभियान, २४ तास पाणीपुरवठा, देशातील सर्वात चांगली सांडपाणी व्यवस्थापन प्रणाली, क्षेत्रफळाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मैदाने व उद्याने असलेले शहर असा नावलौकिक महापालिकेने मिळविला आहे. अनेक पुरस्कार मिळवितानाच पालिकेने आर्थिक स्थिती मजबूत केली आहे. तीन हजार कोटींच्या ठेवी महापालिकेने ठेवल्या असून, सलग दुसऱ्या वर्षी अर्थसंकल्पात तीन हजार कोटींपेक्षा जास्त उद्दिष्ट ठेवले आहे.पालिकेची आर्थिक घडी एका दिवसामध्ये बसलेली नाही. यासाठी आतापर्यंतचे आयुक्त, लोकप्रतिनिधी, अधिकारी व कर्मचाºयांनी अथक प्रयत्न केले आहेत. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पहिल्याच वर्षी फक्त १८ कोटी ५८ लाख रुपये वसूल झाले होते; पण यामुळे निराश न होता उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. सद्यस्थितीमध्ये शहरामध्ये ३१३४८० मालमत्तांना कर आकारला जात आहे. यामध्ये २५९५६५ निवासी, ४८९६० अनिवासी व ४९५५औद्योगिक मालमत्ता आहेत. एमआयडीसीकडून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होत असला तरी अनेक वर्षे उद्योजकांनी मालमत्ताकर भरण्यास विरोध दर्शविला होता. या विरोधात अनेक वर्षे न्यायालयात याचिका सुरू होती. पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयापर्यंत योग्य भूमिका मांडून ही लढाई जिंकली.

मालमत्ता कर व सेस हे सुरुवातीला प्रमुख उत्पन्नाचे मार्ग होते. या दोन्ही माध्यमातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी योग्य नियोजन व त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सेस जाऊन एलबीटी आला. एलबीटी रद्द झाल्यानंतर शासनाने अनुदान सुरू केले.स्थानिक संस्था कराचे अनुदानही जास्तीत जास्त मिळविण्यासाठी महापालिकेने पाठपुरावा केला व पुढील वर्षासाठी या करापासून ११५७ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. २५ वर्षांमध्ये तब्बल २४८१० कोटी रुपये उत्पन्न मिळविण्यात आले.या निधीमुळे चांगले रस्ते, स्वत:च्या मालकीचे धरण, देशातील सर्वात चांगले महापालिकेचे मुख्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनची उभारणी व इतर प्रकल्प उभारण्यात यश आले आहे.अर्थसंकल्प व प्रत्यक्ष महसूल (आकडे कोटींमध्ये)वर्ष तरतूद प्रत्यक्ष फरक१९९५-१९९६ ७९.३४ १८.५८ ६०.७६ (कमी)१९९६-१९९७ ९५.३६ ३७.०२ ५८.३४ (कमी)१९९७-१९९८ १२६.८७ ५५.३४ ७१.५३ (कमी)१९९८-१९९९ १९८.२५ १०१.८५ ९६.४ (कमी)१९९९-२००० २५३.१५ १३५.२७ ११७.८८ (कमी)२०००-२००१ २८०.४७ १९९.७३ ८०.७४ (कमी)२००१-२००२ २९०.२२ २०९.७२ ८०.५ (कमी)२००२-२००३ २७४.६६ १८४.७८ ८९.८८ (कमी)२००३-२००४ ४६८.२६ २९०.४९ १७७.७७ (कमी)२००४-२००५ ३९२.१३ ३११.८६ ८०.२७ (कमी)२००५-२००६ ५४९.४० ३३९.२४ २१०.१६ (कमी)२००६-२००७ ६३६.८५ ५३०.४६ १०६.३९ (कमी)२००७-२००८ ७५२.४१ ५३०.३५ २२२.०६ (कमी)२००८-२००९ १४२६.८७ ६५०.५४ ७७६.३३ (कमी)२००९-२०१० १३७५.२३ ९१६.२७ ४५८.९६ (कमी)२०१०-२०११ १६५४.७५ १०७२.५६ ५८२.१९ (कमी)२०११-२०१२ १९३५.३५ १०२७.१८ ९०८.१७ (कमी)२०१२-२०१३ २२००.०९ ११९७.५८ १००२.५१ (कमी)२०१३-२०१४ २६८०.४३ १३४२.८९ १३३७.५४ (कमी)२०१४-२०१५ २०९९.८५ १४२१.७५ ६७८.१ (कमी)२०१५ - १६ १९५६.९३ १८७७.६२ ७९.३१ (कमी)२०१६ - १७ २०२४.१० २२९५.१९ २७१ (जास्त)२०१७ - १८ २९८७.२ २९८७.१४ १२ लाख (जास्त)२०१८ - १९ ३६७१.०३ ३६२१.०९ ५०.२१ लाख (कमी)२०१९ - २० ३४५५.६४ - -

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBudgetअर्थसंकल्प