11 व्या मजल्यावरुन पडून 19 वर्षीय कॉलेज तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 22:52 IST2018-08-21T22:51:13+5:302018-08-21T22:52:05+5:30
कामोठे येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून एका कॉलेज तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रीती गरड असे या 19 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती कामोठे सेक्टर 36 मधील अंबे श्रद्धा या सोसायटीत राहत होती.

11 व्या मजल्यावरुन पडून 19 वर्षीय कॉलेज तरुणीचा मृत्यू
पनवेल : कामोठे येथील इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून पडून एका कॉलेज तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रीती गरड असे या 19 वर्षीय तरुणीचे नाव आहे. ती कामोठे सेक्टर 36 मधील अंबे श्रद्धा या सोसायटीत राहत होती. प्रीतीच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली असून शेजारील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता घराच्या बाल्कनीत गेली असता तोल गेल्याने प्रीती खाली पडली. इमारतीच्या 11 व्या मजल्यावरुन गार्डन परिसरात पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. प्रीती सध्या केएलई महाविद्यालयात एफवायबीकॉमच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरू केला आहे.