शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

फी भरली नाही म्हणून १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले, उरणच्या युईएस इंग्रजी शाळेतील प्रकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 19:02 IST

शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात  पालक- शिक्षक संघटनेचा जोरदार संघर्ष

मधुकर ठाकूर

उरण : शाळेची फी भरली नाही म्हणून येथील नामांकित इंग्रजी युईएस शाळेतील ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. यामुळे संतप्त झालेल्या पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात गुरुवारी (१५) जोरदार संघर्ष निर्माण झाला.

उरण येथील उरण एज्युकेशन संस्थेच्या (युईएस) इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १ ते १२ पर्यत तीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये गरिब-गरजू सफाई कामगार,  रिक्षावाल्यापासून मोठ्या श्रीमंतांपर्यतची मुले शिक्षण घेत आहेत. कधी भरमसाठ करण्यात आलेली फी वाढ आणि संस्थेने चालविलेल्या मनमानी कारभारामुळे येथील विद्यार्थी पालक त्रस्त झाले आहेत. कोरोना काळापासून थकित असलेल्या गरीब विद्यार्थी, पालकांना शाळेकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. त्याविरोधात याआधीच पालक शिक्षक संघ आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. यामध्ये आजच्या घटनेची भर पडली आहे.

गुरुवारी (१५) सकाळीच शाळा सुरू होताच  शाळेची फी भरली नाही म्हणून शाळेतील वर्ग शिक्षिकांनी ६ वी ते १० वीतील १८ विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. फी वसुलीसाठी विद्यार्थ्यांना चार तास बाहेर उभे केले. मेसेज, फोन करून पालकांनाही बोलावून घेतले. पालक- विद्यार्थ्यांना फी वसुलीसाठी अपमानित केले. यामुळे शाळेच्या पालक शिक्षक संघाच्या काही पदाधिकारी आणि सदस्यांनी थेट शाळेत जाऊन शाळा व्यवस्थापनालाच जाब विचारला. यामुळे पालक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात जोरदार संघर्ष निर्माण झाला.

एका नम्रता मढवी या महिलेने सातवीत शिकत असलेल्या मुलाच्या थकित असलेल्या पाच हजार रुपये फीसाठी मंगळसूत्र गहाण ठेवून दोन दिवसांपूर्वीच २५०० रुपये भरले आहेत. उर्वरित फी येत्या चार आठ दिवसात भरण्याचे सांगितले होते. मात्र शिक्षक, व्यवस्थापनाने अशा विद्यार्थ्यांलाही वर्गाबाहेर काढून घोडचुक केली आहे. हा विद्यार्थी पालकांवर अन्याय आहे. त्यामुळे मुजोर शिक्षक, व्यवस्थापनाने माफी मागितली पाहिजे.

ॲड.प्राजक्ता गांगण, उपाध्यक्षयुईएस पालक-शिक्षक संघटना

विद्यार्थी-पालकांवर अन्याय झाला आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कोरोना काळापासूनच विद्यार्थी-पालकांना फी भरण्यासाठी सवलत दिली जात आहे. याआधीही १३० विद्यार्थ्यांच्या फी माफीचा निर्णय घेण्यात आला होता.थकित फी बाबत निश्चितपणे सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालक संघटना, व्यवस्थापन यांची बैठक घेतली जाईल.विद्यार्थी-पालक यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठीही  दक्षता घेतली जाईल.मिलिंद पाडगावकर, उपाध्यक्षउरण एज्युकेशन सोसायटी

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या