शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

शिक्षक बनला हैवान! पालिका शाळेत केला १४ विद्यार्थिनींचा विनयभंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 18:41 IST

संगणक शिक्षकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

ठळक मुद्दे डोंबिवली येथून महापे येथे महापालिका शाळेत एका एनजीओच्या वतीने संगणक शिकवण्यासाठी येत होता. विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे निदर्शनास येताच मुख्याध्यापिकेने तत्काळ संबंधित सामाजिक संस्थेला याविषयी माहिती दिली.

नवी मुंबई - महापालिका शाळेतील १४ विद्यार्थींचा विनयभंग केल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकरणी संगणक शिक्षकावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी शिक्षक डोंबिवली येथे राहणारा असून तो डोंबिवली येथून महापे येथे महापालिका शाळेत एका एनजीओच्या वतीने संगणक शिकवण्यासाठी येत होता.नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात एका शाळेमध्ये खासगी कंपनी आणि सामाजिक संस्थेच्या (एनजीओ) वतीने संगणकवर्ग सुरू होते. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिले जात होते. परंतु, शिक्षक त्याला दिलेल्या वेळेत विद्यार्थ्यांना शिकवत नव्हता. १२ फेब्रुवारी रोजी दुसरी ते चौथी च्या विद्यार्थ्यांची सहल होती. त्या दिवशी आरोपीने सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले होते. सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना बोलावल्याचे निदर्शनास येताच, मुख्याध्यापिकेने १३ फेब्रुवारीला प्रत्येक वर्गावर जाऊन अशाप्रकारे सुट्टीच्या दिवशी कोणीही बोलावले तरी शाळेत यायचे नाही, अशा सूचना दिल्या. यानंतर काही विद्यार्थिनींनी मुख्याध्यापिकेस भेटून संगणक शिक्षक दोन महिन्यांपासून चुकीचे असभ्य वर्तन करत असल्याचे सांगितले.विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याचे निदर्शनास येताच मुख्याध्यापिकेने तत्काळ संबंधित सामाजिक संस्थेला याविषयी माहिती दिली. सामाजिक संस्थेने तुर्भे पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला. विद्यार्थिनींशी चर्चा केली असता १४ मुलींनी विनयभंग झाल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी २५ फेब्रुवारीला आरोपीविरोधात भा. दं. वि कलम ३५४ आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. न्यायालयाने याला २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगSchoolशाळाStudentविद्यार्थीPoliceपोलिसArrestअटकNavi Mumbaiनवी मुंबई