शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Zika virus: कोरोनापेक्षा अधिक चिंताजनक ठरू शकतो झिका विषाणू, तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 22:50 IST

Zika virus: एकीकडे केरळमध्ये कोरोना विषाणू थैमान घातल असतानाच आता राज्यामध्ये झिका विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत.

ठळक मुद्देकुठल्याही राज्याच किंवा प्रदेशामध्ये झिका विषाणूचे रुग्ण सापडले तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरजझिका विषाणू हा एडिज जातीच्या डासांनी चावा घेतल्याने पसरतो जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार झिका विषाणू हा डासांमधून निर्माण होणारा प्लेविव्हायरस आहे

तिरुवनंतपुरम - एकीकडे केरळमध्ये कोरोना विषाणू थैमान घातल असतानाच आता राज्यामध्ये झिका विषाणूचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. दरम्यान, मच्छरींच्या माध्यमातून पसरणारा हा आजार कोरोना विषाणूच्या तुलनेत अधिक गंभीर होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे संचालक आणि प्राध्यापक डॉ. नरेश गुप्ता यांनी एएनआयला सांगितले की, या विषाणूची प्रयोगशाळेमध्ये तपासणी झाली पाहिजे. तसेच या विषाणूबाबत आपण गांभीर्याने विचारही केला पाहिजे. हा असा विषाणू आहे जो मच्छरांच्या चावण्यामुळे पसरतो. त्यामुळे जर कुठल्याही राज्याच किंवा प्रदेशामध्ये झिका विषाणूचे रुग्ण सापडले तर त्याच्यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. (Zika virus could be more worrying than corona Virus, experts warn)

दरम्यान, गुरुवारी केरळमध्ये पाच अजून लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यामुळे झिका विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे. तिरुवनंतपुरममधील नव्या रुग्णांच्या संसर्गाला अलापुझामध्ये नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या स्थानिक केंद्रात चाचणी केल्यानंतर दुजोरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे झिका विषाणूच्या वाढत्या रुग्णांची संख्या विचारात घेऊन राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी आरोग्याच्या प्रश्नावर आपातकालिन बैठक बोलावली होती.

झिका विषाणू हा एडिज जातीच्या डासांनी चावा घेतल्याने पसरतो. हे डास डेंग्यू, चिकनगुनियासारखे आजारही पसरवताता. डॉ. गुप्ता यांनी प्रकोपाच्या स्थानिक रूपाचा हवाला देत सांगितले की व्हेक्टर जनित आजार कोविड-१९ च्या तुलनेत अधिक चिंतेचा विषय आहे. मात्र व्हेक्टर नियंत्रणाच्या उपायांनी या आजाराला रोखता येऊ शकते, असे अन्य वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार झिका विषाणू हा डासांमधून निर्माण होणारा प्लेविव्हायरस आहे. हा विषाणू सर्वप्रथम १९४७ मध्ये युगांडामधील माकडांमध्ये दिसून आला होता. त्यानंतर १९५२ मध्ये युगांड आणि टंझानियामध्ये त्याचा माणसाला संसर्ग झाला. आतापर्यंत झिका विषाणूचा संसर्ग हा आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि पॅसिफिक क्षेत्रात दिसून आला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याZika Virusझिका वायरसHealthआरोग्यKeralaकेरळIndiaभारत