पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 16:08 IST2023-04-24T16:06:07+5:302023-04-24T16:08:15+5:30

YS शर्मिला या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगन मोहन रेड्डी यांच्या भगिनी आहेत.

YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained | पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल

पोलिसांच्या अंगावर गाडी घातली, धक्काबुक्कीही केली; YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांचा व्हिडिओ व्हायरल


TSPSC Paper Leak Case:तेलंगणामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. YSRTP प्रमुख वायएस शर्मिला यांनी पोलिसांच्या अंगावर गाडी चढवत त्यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. TSPSC प्रश्नपत्रिका लीक प्रकरणी वायएस शर्मिला एसआयटी कार्यालयात जात होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 

यावेळी शर्मिला यांच्या ड्रायव्हरने पोलिसां कार चढवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शर्मिला गाडीतून खाली उतरल्या आणि पोलिसांशी वाद घातला. इतकंच नाही, तर वादानंतर पोलिसांना धक्काबुक्कीही केली. इतकं करुनही त्यांचे मन भरले नाही. यानंतर त्या धरणा देत बसल्या. त्यांच्या पोलिसांच्या अंगावर गाडी घातल्याचा आणि धक्काबुक्की केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

शर्मिला आधी पुरुष पोलिसांना आणि नंतर महिला पोलिसांना धक्काबुक्की करतात. विशेष म्हणजे, शर्मिला यांनी प्रश्नपत्रिका लीक प्रकरणी एसआयटी कार्यालयात जाण्याची घोषणा आधीच केली होती. यानंतर त्यांना घराबाहेर पडण्यापासून रोखण्यात आले. वातावरण तापत असल्याने आणि तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वायएस शर्मिला यांना ताब्यात घेतले आहे. 

Web Title: YSRTP Chief YS Sharmila manhandles police personnel as she is being detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.