हरियाणातील रहिवासी असलेली लोकप्रिय युट्यूबर ज्योती मल्होत्रालापाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योतीची पाकिस्तानी बहीण हिरा बतूल पुन्हा एकदा तिचं समर्थन करण्यासाठी पुढे आली आहे. हिराने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने "ज्योती फक्त एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, गुप्तहेर नाही" असं म्हटलं आहे.
हिरा बतूलने तिच्या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "ज्योती फक्त एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे, गुप्तहेर नाही. निष्पाप लोकांना टार्गेट करणं बंद करा. मी अजूनही म्हणते की ती निर्दोष आहे. मी व्यवसायाने पत्रकार आहे आणि त्यामुळे माझं सर्वांशी कनेक्शन आहे. मला कोणत्याही कारणाशिवाय टार्गेट केलं जात आहे. मी अजूनही माझ्या विधानावर ठाम आहे आणि सत्यासोबत उभी आहे ."
"माझ्याकडे पैसे नाहीत..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांनी सरकारकडे केली 'ही' मोठी मागणी
ज्योती मल्होत्राचा हिरा बतूलसोबतचा एक व्हिडीओ ऑनलाइईन समोर आला आहे, ज्यामध्ये ज्योतीने हिराला तिची 'बहीण' असल्याचं म्हटलं आहे. ज्योती दुसऱ्यांदा पाकिस्तानला गेली तेव्हा तिची भेट हिराशी झाली. हिरा बतूल ही व्यवसायाने पत्रकार आणि इन्स्टाग्रामवर इन्फ्लुएन्सर आहे.
पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. असा आरोप आहे की, ती पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयमधील लोकांशी संपर्कात होती, ज्यात दानिशचाही समावेश होता. दानिशने ज्योतीचा व्हिसा मिळवून दिला, त्यानंतर ती पाकिस्तानला गेली. तो पाकिस्तानमधील आयएसआय एजंट्सच्या संपर्कात आला. ज्योती त्यांच्याशी व्हॉट्सएप आणि टेलिग्रामद्वारे संवाद साधत होती.