धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 15:54 IST2025-05-18T15:53:03+5:302025-05-18T15:54:16+5:30
YouTuber Jyoti Malhotra Case: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली युट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक करण्यात आले आहे.

धक्कादायक खुलासा! ISI अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती ज्योती, गुप्तचर नेटवर्क चालवतोय पाकिस्तान
Jyoti Malhotra Arrested:पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या प्रकरणात आता एकामागून एक खुलासे होत आहेत. हरियाणातील हिसार येथील रहिवासी ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या तीन अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती आणि त्या तिघांच्या खूप जवळची होती. पाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या दानिशने ज्योतीची या अधिकाऱ्यांशी ओळख करून दिल्याचे उघड झाले आहे.
एवढेच नाही तर दिल्लीतील पाकिस्तानी दूतावास व्हिसा देण्याच्या नावाखाली आयएसआय नेटवर्क चालवत आहे. पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मागणाऱ्या लोकांना जाळण्यात ओढण्याचा प्रयत्न केला जातो, जर लोक सहमत नसतील, तर त्यांचा व्हिसा नाकारला जातो. आयएसआय अशा लोकांना शोधत राहते, ज्यांना कोणत्याही परिस्तितीत पाकिस्तानला जाण्यासाठी व्हिसा मिळवायचा आहे. ज्योतीदेखील अशाच प्रकारे आयएसआयच्या संपर्कात आली.
कोण आहे ज्योती मल्होत्रा ?
युट्यूबर ज्योती ही हरियाणा पॉवर डिस्कमच्या निवृत्त अधिकाऱ्याची मुलगी आहे. ती पदवीधर असून, तिचे YouTube वर 3.21 लाख फॉलोअर्स आहेत. तिने पाकिस्तान दौऱ्याचे व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केले आहेत. पाकिस्ताच्या दौऱ्यादरम्यान ज्योतीची पाकिस्तानी दूतावासातील अधिकारी दानिशशी ओळख झाली. दानिशला हेरगिरीच्या आरोपाखाली 13 मे रोजी देशातून हाकलून लावण्यात आले होते. तो व्हॉट्सअॅप, स्नॅपचॅट आणि टेलिग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे पाकिस्तानला संवेदनशील माहिती पाठवत असे.
ज्योती दानिशच्या संपर्कात कशी आली?
2023 मध्ये जेव्हा ज्योतीला पाकिस्तानला जायचे होते, तेव्हा ती व्हिसा मिळविण्यासाठी पाकिस्तानी दूतावासात गेली. याच काळात तिची भेट दानिशशी भेट झाली. यानंतर ती दानिशला अनेक वेळा भेटल्याचा आरोप आहे. ती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्याही संपर्कात होती. पाकिस्तानात पोहोचल्यावर दानिशच्या ओळखीचा अली अहवान याने ज्योतीला मदत केली. या पोलिस ज्योतीची चौकशी करत आहेत.